Subscribe Us

header ads

विभागीय आयुक्त कार्यालयावरील एक दिवसीय उपोषणाला बीड जिल्ह्यातील प्रहार सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ----- रघुनाथ तोंडे

बीड स्पीड न्यूज 


विभागीय आयुक्त कार्यालयावरील एक दिवसीय उपोषणाला बीड जिल्ह्यातील प्रहार सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ----- रघुनाथ तोंडे


किल्ले धारूर प्रतिनिधी-: भारत देश आपल्या स्वतंत्रयाचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना अद्याप दिव्यांग बांधव शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहिला असल्यामुळे  प्रहार चे संस्थापक अध्यक्ष वंदनीय आ. बच्चु भाऊ कडु यांनी दिव्यांगाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्याची मागणी केली आहे. त्याकरिता विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे गुरुवार दिनांक 25 आगष्ट रोजी प्रहार संघटनेच्या वतीने संघनेचे राज्य अध्यक्ष बापुराव काणे राज्य संपर्क प्रमुख रामदास खोत मराठवाडा अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वात संघटनेच्या वतीने एक दिवसीय उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणाला बीड जिल्ह्यातील प्रहार सैनिक दिव्यांग संघनेचे पदाधिकारी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हा प्रहार संघनेचे अध्यक्ष रघुनाथ तोंडे यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक