Subscribe Us

header ads

मिल्लिया महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापनदिन उत्साहात साजरा

बीड स्पीड न्यूज 


मिल्लिया महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापनदिन उत्साहात साजरा

बीड: येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात दिनांक 23 ऑगस्ट 2022,  मंगलवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद चा 64 वा वर्धापनदिन मोठया उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांच्या शुभहस्ते सकाळी 08: 15 वाजता विद्यापीठ ध्वजारोहण करण्यात आले. विद्यापीठ वर्धापन दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयचे उपप्राचार्य तथा क्रीडा विभाग प्रमुख डॉ. सय्यद हनीफ यानी आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे  उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस. एस., पदव्युत्तर विभागाचे संचालक प्राध्यापक फरीद नेहरी, आयक्यूएसी चे समन्वयक डॉ.अब्दुल अनिस, करिअर कट्टा चे समन्वयक डॉ. मोहम्मद असिफ इकबाल, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विष्णू सोनवणे, प्राध्यापिका डॉ. संध्या बीडकर, डॉ. खय्युम फारूकी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी- विद्यार्थिनी, सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा