Subscribe Us

header ads

दलितांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिंदे सरकार सकारात्मक

बीड स्पीड न्यूज 


दलितांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिंदे सरकार सकारात्मक


विकासात्मक चर्चा : मंत्री रामदास आठवलेंनी घेतली मुख्यमत्र्यांची भेट


बीड / प्रतिनिधी-: राज्यातील दलितांच्या विविध प्रश्नासंदर्भात रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवास्थानी भेट घेतली. या भेटीत दलितांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. दलितांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिंदे सरकार सकारात्मक भूमिका पार पाडील असा विस्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री रामदास आठवले यांना दिला. यावेळी युवा रिपाइं प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे, राजा सरवदे, बाबुराव कदम, गौतम सोनवणे, भूपेश तुलकर, चंद्रकांत सोनकांबळे यांची उपस्थिती होती.दलितांच्या न्याय हक्कासाठी मंत्री रामदास आठवले नेहमीच अग्रेसर 

भूमीका घेत आलेले आहेत. मंत्री रामदास आठवले यांनी देशात आणि राज्यात दलितांचे प्रश्न प्रखडतेने मांडत आवाज उठविण्याचे काम केलेले आणि करत आहेत. त्या अनुषंगाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्री रामदास आठवले यांनी रिपाइंच्या काही पदाधिकाऱ्यांना सोबत भेट घेऊन दलितांच्या विविध विषयांवर चर्चा केली. दरम्यान पीपल एज्युकेशन सोसायटीला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देण्यात यावी. मुंबईतील झोपडपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात यावा. दलित वर्ग कसत असलेल्या गायरान जमिनीचा प्रश्न सोडविण्यात यावा. याबरोबरच विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री रामदास आठवले यांना दलितांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार सकारात्मक राहील, असा विस्वास दिला. यावेळी रिपाइंचे प्रमुख पदाधिकारी मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत उपस्थित होते.
    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा