Subscribe Us

header ads

केज तालुक्यात विज पडून महिला ठार

बीड स्पीड न्यूज 

केज तालुक्यात विज पडून महिला ठार



केज | प्रतिनिधी -: बीड जिल्ह्यात वरुन राजाने आज जोरदार हजेरी लावली विजेच्या कडकड्यासह सर्वत्र पाऊस पडत आहे. शेतीचे कामे ही चालु आहेत त्या कारणाने शेतकरी शेतात गेले होते. आज दिनांक ३१ ऑगस्ट वार बुधवार रोजी केज तालुक्यांतील मौंजे काळेगाव घाट येथील शेतकरी रामचंद्र चंद्रकांत आगे व त्यांची पत्नी शिला रामचंद्र आगे अन्नपूर्णा आत्माराम आगे आणि आत्माराम माणिक आगे हे शेतीतील कामे आटोपून सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घरी जात असताना विजेच्या कडकड्याचा पावसाने सुरुवात केली. आणि अचानक शिला रामचंद्र आगे (वय ३४ वर्ष) यांच्या अंगावर विजेचा लोळ पडला विजेचा लो पडताच शीला आगे यांचा जागीच मृत्यु झाला. जवळ असणारा तिचा पती रामचंद्र चंद्रकांत आगे (वय ३८ वर्ष) हा गंभीर जखमी झाला तर आत्माराम आगे आणि अन्नपूर्णा आगे हे दोघे सुखरूप आहेत. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार मेंडके यांनी तलाटी सोनवणे यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले. सोबत स.पो. नि. वाघमोडे. यांचा मार्गदर्शनाखाली बीट जमादार गुंजाळ. यांनी मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी केज येथे हलविण्यात आला आहे. मृत्युपावलेल्या शीला आगे आणि जखमी पती रामचंद्र आगे या दांपत्यास एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्ये आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा