Subscribe Us

header ads

ज्ञान प्राप्त केल्याने आत्मविश्वास वाढतो, प्रत्येक मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होणे गरजेचे आहे...अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर

बीड स्पीड न्यूज 


ज्ञान प्राप्त केल्याने आत्मविश्वास वाढतो, प्रत्येक मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होणे गरजेचे आहे...अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर

महिला महाविद्यालयात जागर स्त्री शक्तींचा कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन


परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी) ज्ञान प्राप्त केल्याने आत्मविश्वास वाढतो, आजच्या काळात प्रत्येक मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांनी केले. येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात नवरात्री निमित्त आयोजित जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात विद्यार्थिनींना तयारी स्पर्धात्मक परिक्षांची या व्याख्यानात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजयजी देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे उपस्थित होते. सुरुवातीला विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेस मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांचा शाल, स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा.प्रविण फुटके यांनी केले तर पुढे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रीमती नेरकर म्हणाल्या की, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्यांनी स्वतः ची तयारी असेल तरच अभ्यासास सुरुवात करावी, जबरदस्ती किंवा पालकांच्या दबावापोटी हे करु नये यात यश मिळणार नाही. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करताना चालू घडामोडींचा चांगला व सविस्तर अभ्यास करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोशलमिडीयापासून दूर राहिले पाहिजे. पुणे, मुंबईत जावून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्याची गरज नाही, इथेही अभ्यास करु शकता असा मौलिक सल्ला कविता नेरकर यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. विनोद जगतकर व प्रा.डॉ प्रविण दिग्रसकर यांनी तर आभार पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा