Subscribe Us

header ads

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. प्रमोद येवले सर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन

बीड स्पीड न्यूज 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. प्रमोद येवले सर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन 


बीड : (प्रतिनिधी ) आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि सौ. के.एस.के.महाविद्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित " राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 " या एक दिवसीय कार्यशाळे साठी कुलगुरू मा. डॉ. प्रमोद येवले सर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत प्राचार्या डॉ.दिपाताई क्षीरसागर मॅडम (सौ.के.एस.के.महाविद्यालय,बीड) प्राचार्य प्रो.डॉ.हांगे सर,(पद्मश्री वसंतदादा पाटील महाविद्यालय,पाटोदा), प्राचार्य डॉ.कंधारे सर,(कालिकादेवी महाविद्यालय, शिरूर कासार) उपप्राचार्य डॉ.संजय पाटील सर (सौ.के.एस.के.महाविद्यालय, बीड ) आदींची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी नवगण शिक्षण संस्था राजुरी (न.) संचलित,कला विज्ञान महाविद्यालय तेलगाव, येथील प्र.प्राचार्य डॉ.कांबळे सुरेंद्रनाथ भानुदासराव यांनी लिहिलेल्या "प्रतिनिधी मराठी संतों के हिंदी काव्य में सामाजिक उपदेश" या हिंदी भाषेतील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कुलगुरु डॉ.प्रमोद येवले सर यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी बीड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा