Subscribe Us

header ads

नगर रोड दुरूस्त नाही, नव्यानेच होणार आ.संदीप क्षीरसागर यांचा पाठपुरावा

बीड स्पीड न्यूज 


नगर रोड दुरूस्त नाही, नव्यानेच होणार आ.संदीप क्षीरसागर यांचा पाठपुरावा

बीड दि.२७ (प्रतिनिधी):- गेल्या अनेक दिवसांपासून बीड शहरातील सर्वात महत्वाचा आणि जिल्हा न्यायालयासह, सर्व विभागाचे जिल्हा मुख्यालये असलेल्या नगर रोडवरील खड्ड्यांमुळे नागरीकांचे प्रचंड हाल सुरू होते. यावर आ.संदीप क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून आता या रस्त्याची दुरूस्ती नव्हे तर सिमेंट- कॉंक्रीटचा नवीन रस्ता तयार करण्यात येणार आहे. बीड शहरासह जिल्ह्याभरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला नगर रोड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. नगर रोडची सध्यस्थितीला अक्षरशः चाळण झाली असून प्रवासावेळी नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. वारंवार, नगर रोड रहदारी योग्य राहीला नसल्याचा प्रश्न उपस्थित केला जात होता. राष्ट्रीय महामार्ग (NH 561) असलेला हा रस्ता बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातंर्गत शिरापूर धुमाळ ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आहे. आ.संदीप क्षीरसागर यांनी या रस्ता संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री व राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. या रस्ताकामाची सध्या निविदा प्रक्रिया सुरू असून पुढील बाबींच्या पुर्ततेनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शिरापूर धुमाळ पर्यंतचा संपूर्ण रस्ता सिमेंट-कॉंक्रीटचा होणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरासह जिल्हाभरातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.


कंत्राटदाराने बॅंक हमी सादर न केल्याने रखडले होते काम

नगर रस्त्याची निविदा प्रक्रिया, प्रशासकीय मान्यतेसह या अगोदरच पूर्ण झाली होती. या रस्त्याचे कंत्राटही जाहीर झाले होते परंतु संबंधित कंत्राटदाराने निविदा प्रक्रियेतील बॅंक हमी सादर करण्याचा टप्पा पूर्ण न केल्याने शासनाकडून हे कंत्राट रद्द करण्यात आले होते. आता पुन्हा आ.संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याने या रस्त्याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याने या संदर्भात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा