Subscribe Us

header ads

अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेच्या धारुर तालुकाध्यक्ष पदी रामलिंग बडे यांची निवड जाहीर

बीड स्पीड न्यूज 


अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेच्या धारुर तालुकाध्यक्ष पदी रामलिंग बडे यांची निवड जाहीर

बीड प्रतिनिधी :- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील येलदरवाडी गावचे सुपुत्र वंचित समाजासाठी व समाजातील घटकांवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारी समाजाची मुलुख मैदानी तोफ श्री धनराज विक्रम गुट्टे संस्थापक अध्यक्ष असलेल्या अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कैलास घुगे यांनी धारुर तालुकाध्यक्ष पदी रामलिंग बडे यांची निवड केली आहे.नियुक्तीचे पत्र देऊन स्वागत करताना अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कैलास (बप्पा) घुगे , शशिकांत सांगळे, बाबुराव दराडे, रामलिंग मुंडे, रजनीकांत खाडे, बद्रिनाथ घुगे, संतोष नागरगोजे, कैलास बांगर व अजय आमटे उपस्थितीत होते.अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेच्या धारुर तालुकाध्यक्ष पदी रामलिंग बडे यांची निवड झाल्याबद्दल तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळींनी त्यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून चांगले काम घडावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कैलास घुगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी  रामलिंग बडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. श्री धनराज गुट्टे हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या सहवासात, तालमीत तयार झालेले समाजाचे धडाडीचे युवक नेतृत्व आहे. ते सध्या भारत सरकारच्या रेल्वे बोर्डाचे सदस्य देखील आहेत, अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष असुन संघटनेच्या माध्यमातून देशभरात त्यांनी समाजाचे मोठे संघटन उभे करत असताना दिवसरात्र ते राजकीय व सामाजिक कामानिमित्त प्रवासात असतात. आज पर्यंत त्यांनी अनेक सामाजिक प्रश्न आंदोलनांच्या माध्यमातून सोडवले आहेत. ते जेवढे शांत, संयमी आहेत तेवढेच आक्रमक देखील असतात. राजकारण व प्रशासन यावर त्यांची मजबूत पकड असल्याने त्यांना प्रशासनाचा सखोल अभ्यास देखील आहे. ते उत्कृष्ट संघटक व वक्ते आहेत तसेच ते निर्व्यसनी युवा व्यक्तिमत्व आहे. असे अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कैलास घुगे यांनी सांगितले. तसेच सध्याच्या युवा पिढी मध्ये श्री गुट्टे हे लोकप्रिय नेतृत्व असुन राज्यभरात त्यांचा कायम झंझावात असतो. असे यावेळी अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कैलास घुगे यांनी सांगितले. अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेच्या धारुर तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल रामलिंग बडे यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा