Subscribe Us

header ads

सात हजार रुपयांची लाच घेताना अंबाजोगाईच्या तलाठ्यासहा खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात!

बीड स्पीड न्यूज 

सात हजार रुपयांची लाच घेताना अंबाजोगाईच्या तलाठ्यासहा खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात! 


अंबाजोगाई | प्रतिनिधी -: बीड जिल्ह्यातील काही अधिकार लाच घेतल्याशिवाय काम करत नाहीत पैसे घेऊन बोगस कामे करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. अश्याच एका तलाठ्याने  टॅक्स पावती न देता ७/१२ फेरफार नोंद करण्यासाठी दहा हजाराची लाच मागीतली समोरील व्यक्ती गरीब असल्याने तडजोड करुन सात हजार रूपये जमाऊन एका इसमाच्या हस्ते लाच घेतांना दोघानाही बीड येथील एसीबीच्या पथकाने आंबेजोगाई शहरात दिनांक २६  रोजी रंगेहाथ पकडले. प्रफुल्ल सुहासराव आरबाड (वय ३०  वर्ष) राहणार प्रशांत नगर आंबेजोगाई असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तसेच नाजिरखान उमरद राजखान पठाण (वय ४२ वर्ष) राहणार फ्लावर्स क्वार्टर आंबेजोगाई असे खाजगी इसमाचे नाव आहे. तक्रारदाराने खरिदी केलेल्या एका प्लॉटची ७/१२ फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी यांनी तक्रारदाराने दहा हजारांची लाच पांचासमोर मागीनी केली. ही बाब एसीबीना माहित होताच सोमवारी सापळा रचला लाचखोर तलाठी प्रफुल्ल आरबाड आणि नजीरखान उमरद राजखान पठाण यांनी तक्रारदारास गाडीवर पाठीमागे येण्यास सांगीतले दोन्हीं गाड्या शितल बियर बार समोर येऊन थांबल्या दुचाकीवरून तक्रारदारास पठाण यांच्याकडे पैसे देण्यास सांगितले पठाण याने पंचासमोर सात हजाराचा लाच स्वीकारली आणि तलाठ्यास लाचेची रक्कम मिळवून देण्यासाठी सहकार्य केले. असता लाचेच्या रकमेसह दोघांना पकडुन ताब्यात घेतले असता आंबेजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक बीड शंकर शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी निरीक्षक अमोल धस, पोलीस अमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, संतोष राठोड, आणि चालक गणेश मेहत्रे यांनी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा