Subscribe Us

header ads

हम भीक नही मांगरये है हम हमारा हक्क मागरये है -अरुण चव्हाण

बीड स्पीड न्यूज 


हम भीक नही मांगरये है हम हमारा हक्क मागरये है -अरुण चव्हाण

ऊसतोड कामगारांना न्याय द्या अन्यथा कोयता घेऊन रस्त्यावर उतरणार 

माजलगावच्या महामेळाव्यातून गोरसेनेने सरकारला दिले पंधरा दिवसाचे अल्टिमेटम


माजलगाव, दि.15 (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्यातील ऊसतोड कामगारांचा विविध प्रश्नाबाबत माजलगाव येथे ऊसतोड मजूर कामगार मुकादम व वाहतूकदार यांचा महामेळावा घेण्यात आला यावेळी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हाण यांनी सरकारला पंधरा दिवसाच्या आत ऊसतोड मजूर कामगारांचे प्रश्न मार्गी लावा अन्यथा कोयता घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगत हम भीक नही मांगरये हम हमारा हक्क मांग रहे है असे मत त्यांनी बोलताना सांगितले.यावेळी मंचावर गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हाण, राष्ट्रीय संयोजक  विलास रामावत, ऍड. रविकांत अंगडी, महिला 

प्रदेश अध्यक्ष साधनाताई राठोड, उत्तम पवार, राजेभाऊ पवार, नवनाथ आडे, लहू आडे, साहेबराव जाधव बंडू राठोड,प्रकाश राठोड यांच्यासह आदी प्रमुख उपस्थिती होती. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे मात्र आजही आमचा ऊसतोड मजूर कामगार वाहतूकदार व मुकादम पारतंत्र्यातच जगताय की काय अशी परिस्थिती आहे. परंतू आजही कामगार पारतंत्र्याचे जीवन जगत आहे. त्यात ऊसतोड कामगारांची अवस्था अत्यंत दैनिय झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ऊसतोडांच्या मलभुत हक्काकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले 

आहे. त्याच्या मुख्य मागण्याबाजूला ठेवून येथील राजकीय नेत्यांनी स्वतःची पोळी भाजवून घेण्यासाठी ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतुक दरांचे वापर केले असून त्यांच्या मुख्य मागण्यासाठी महावेळाव्याचे आयोजन केले आहे. यामध्ये  ऊसतोड कामगार यंत्रनाद्वारे दर देण्यात यावे. 2) कामगारांचा जीवन विमा काढण्यात यावा तसेच अपघातात मृत्यू झालेल्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, 3) कामगारांना ज्या ठिकाणी काम करत आहेत त्या ठिकाणी त्यांना राशन देण्यात यावे, कामगारांना ऊसतोड कामगार असल्याचे ओळखपत्र देण्यात यावे, कामगारांच्या मुला-मुलींसाठी वसतीगृह उभारण्यात यावे, ऊसतोड कामगार, मुकादम 25 टक्के व वाहतुकदारांना 50 टक्के दर वाढविण्यात यावे, ऊसतोड कामगार महिला गरोदर असल्यास गर्भवतीस तीन महिन्यांचा भत्ता उपलब्ध करून देण्यात यावा,  बैलगाडी कामगार व मुकादम त्यास काही झाल्यास भरपाई तात्काळ देण्यात यावी,  कामगार, मुकादम व वाहक मालक यांचा समन्वय कायदा निर्माण करण्यात यावा, गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाची प्रत्येक्षात अमल बजावणी करण्यात यावी, ऊसतोड कामगारांना फॅक्टरी अ‍ॅक्ट नुसार मजूर म्हणून मान्यता देण्यात यावी यासह अनेक मागण्या यासल्याचे सांगितले आहे. देशाने अमृत महोत्सव साजरा केला आता आपण आपल्या हक्कासाठी सरकारला जॉब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असून पंधरा दिवसाचे आत सरकारने आपल्या ऊसतोड मजूर भावांनो बद्दल आणि आपल्या मागण्यांबद्दल विचार न केल्यास कोयता घेऊन आंदोलन करण्याची वेळ आली आहे असे मत राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हाण यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष अरुण पवार, देविदास चव्हाण, बिभीषण राठोड, डॉ. जीवन राठोड, जायकोबा राठोड, शरद पवार, सतीश आमगोत, शामभाऊ राठोड, एकनाथ चव्हाण, संतोष राठोड, युवराज राठोड, संजय पवार, लाखा  चव्हाण, बाळू चव्हाण, भाऊराजे चव्हाण, योगेश पवार यांच्या सह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आता ठिणगी पेटली आहे वानवा पेटण्याची वाट पाहू नका?

ऊसतोड कामगार मजूर यांच्या महामेळातून राज्यातील सरकारला घाम फोडण्याची ठिणगी पेटली आहे तरी या सरकारने तात्काळ निर्णय घेऊन ऊसतोड कामगार बांधवांना न्याय देण्याची काम करावे अन्यथा पुढील काळात वनवा पेटविला जाईल असेही आव्हान राष्ट्रीय अध्यक्ष यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा