Subscribe Us

header ads

भारत गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल तुळशीराम पवार यांचा सत्कार संपन्न

बीड स्पीड न्यूज 



भारत गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल तुळशीराम पवार यांचा सत्कार संपन्न


परळी (प्रतिनिधी): मराठवाड्यातील व्यसनमुक्ती चळवळीचे नेते तुळशीराम पवार यांना सुशोभिता वेलफेअर असोसिएशन प्रा.लि.ह्युमनवेल आणि अँटीकरप्शन इंडिया फाऊंडेनशच्या वतीने दिला जाणारा भारत गौरव पुरस्कार 2022 चा पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रवादीचे राधाकृष्ण साबळे, अभिजीत देशमुख यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी राजर्षी शाहू छत्रपती स्मारक, दसरा चौक, कोल्हापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शुभहस्ते मराठवाड्यातील व्यसनमुक्ती चळवळीचे नेते श्री तुळशीराम पवार यांना प्रदान करण्यात आला. भारत गौरव पुरस्कार 2022 हा पुरस्कार देउन गौरव करण्यात आला आहे. सुशोभिता वेलफेअर एसोसिएशन प्रा.लि. ह्युमनवेल  अँटीकरप्शन इंडिया फाऊंडेशन च्या मॅनेजिंग डायरेक्टर शोभा कोकिटकर यांच्याकडून पुरस्कारा साठी निवड करण्यात आली होती. कोणत्याही संस्कृतीच्या संवर्धन, संगोपन आणि संरक्षणासाठी समाजातील विविध कार्यक्षेत्रांना विशेष महत्त्व असते. संस्कृतीची नीतिमूल्य व  वैशिष्ट्ये शोधून त्यांचे जतन, विकास व प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाची असते. एक जबाबदार व कर्तव्यदक्ष समाज घटक या नात्याने आपल्या कार्यातून नव्या पिढीस संस्कार, साधना व सत्कार्यासाठी प्रेरणा देण्यासाठी तसेच आदर्श जीवनमूल्यांचे दर्शन घडवत आहेत. आपल्या विशाल कर्तुत्वाने समाज मनावर अधिराज्य गाजविणार्‍या मराठवाड्यातील व्यसनमुक्ती चळवळीचे नेते तुळशीराम पवार यांना मिळाल्याबद्दल त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राधाकृष्ण साबळे, अभिजीत देशमुख यांच्यासह नितीन शिंदे, निरज देशमुख यांच्यासह आदींनी शाल, श्रीफळ, हार व  पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा