Subscribe Us

header ads

बीडमध्ये अन्न व औषध विभागाने भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी - बाळासाहेब धुरंधरे

बीड स्पीड न्यूज 


बीडमध्ये अन्न व औषध विभागाने भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी - बाळासाहेब धुरंधरे

बीड | प्रतिनिधी -: बीड शहरात भेसळयुक्त पदार्थ बनवणाऱ्यांची सध्या सर्वत्र चर्चा रंगली असुन जनतेमध्ये एक प्रकारे भितीचे सावट उभे ठाकले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील, व शहरातील अनेक भेसळयुक्त पदार्थ बनवणाऱ्यांच्या अन्न व औषध प्रशासनाने वेळीच मुसक्या आवळाव्यात अशी नागरीकातुन अपेक्षा होत आहे. सध्या जिल्हाभरात भेसळयुक्त पदार्थ बनवणाऱ्यांने आपले डोके वर काढले आहे ज्यामध्ये भेसळयुक्त पदार्थ, भेसळयुक्त दुध, भेसळयुक्त खवा, फळ तात्काळ पिकवण्यासाठी वारल्या जाणाऱ्या सामग्री, तसेच स्विट पदार्थांमध्ये वापरण्यात येणारे भेसळयुक्त रंगे- बेरंगी कलर व अनेक हाॅटेल्स मध्ये वापरण्यात येणारी टेस्टींग पावडर अन्न व औषध प्रशासनाने आठवड्यामधुन एक- दोनदा तपासाले तर भेसळयुक्त पदार्थ बनवणऱ्यांना मोठी चपराक बसेल व नागरीकांच्या आरोग्यालाही हाणी पोहचणार नाही. तसेच बाजारामध्ये काही पदार्थ तळण्यासाठी वापरले जाणारे हलके पद्धतीचे गोड तेल, अतिचवीचा लागणारे विविध चहा चे प्रकार थंड पेय, असे अनेक पदार्थ बाजारात सर्रासपणे दिसतात असे भेसळयुक्त खाद्य पदार्थ खाल्ल्यानंतर पोटदुखी, मळमळ, सारख्या अनेक समस्या नागरीकांच्या आरोग्यावर बेतल्या असुन या भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांवर अन्न व औषध अधिकारी यांच्याकडुन अशात कुठे कारवाई झालेली दिसत नसुन शहरात केमीकलयुक्त पदार्थ विकले जात आहे त्यामुळे असे पदार्थ बनवणाऱ्या लोकांपासून त्यांच्या जवळील पदार्थ चाचणी साठी घेऊन यात दोषी आढळणाऱ्या व्यक्ती वर ताबडतोप कडक कारवाई करावी. तसेच मार्केटमधील विशेष करुन किराणा दुकानात लहान मुलांचे असलेले सर्व खाद्य पदार्थ तपासावेत कारण काही खाद्यपदार्थांची ज्यास्त चविची असतात त्यामुळे या जास्तिच्या चविचे लागणारे पदार्थ लहान मुलं जास्त प्रमाणात खातात, आणि आजारी पणाला बळी पडत जातात. पण या चविमागचे रहस्य काय आहे.? हे महत्त्वाचे. अशे पदार्थ खाल्ल्यानंतर बऱ्याच मुलांना मळमळ उलटी सारखी लक्षणे आढळुन येत असून अशा बाजारातील सर्वच खाद्यपदार्थांची तपासणी अन्न व औषध अधिकाऱ्यांनी वेळोवेळी करावी कारण असे केमीकलयुक्त खाद्यपदार्थ खाल्यानंतर कॅन्सर सारख्या महाभयंकर आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे भेसळयुक्त पदार्थ बनवणाऱ्या कडक निर्देश करावेत असे रुग्ण मित्र फांऊडेशन चे अध्यक्ष रोहित ऊर्फ बाळासाहेब धुरंधरे यांनी प्रसारमाध्यमां व्दारे मत व्यक्त केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा