Subscribe Us

header ads

शहरातील रस्त्यांची वाट लागली नगराध्यक्ष आमदार व जिल्हाधिकारी कधी लक्ष घालणार-- ॲड. प्रा. इलियास इनामदार

बीड स्पीड न्यूज 


शहरातील रस्त्यांची वाट लागली नगराध्यक्ष आमदार व जिल्हाधिकारी कधी लक्ष घालणार-- ॲड. प्रा. इलियास इनामदार

बीड प्रतिनिधि: ये रे ये रे पावसा नगराध्यक्ष आमदाराने खाल्ला रस्त्याचा पैसा बीड शहरातील रस्ते किती ख़राब झाले जिकडे तिकडे खड्डेच खड्डे झालेले आहे शिवाजी महाराज चौक ते बालेपीर चराटा फाठ्यापर्यंत रस्ता किती ख़राब झाला या रस्त्यावरुन जिल्हाधिकारी साहेब, माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, आमदार संदीप भैय्या क्षीरसागर, नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचा सतत ये जा असून यांना ख़राब रस्ता दिसत नाही का? का जानून बुजुन बीडच्या जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे हा रस्ता तात्काळ बनवावा अशी मागणी लोकसेना संघटना करत आहे, नगर रोडवर न्यायलय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, पंचायत समिती जिल्हापरिषद एल आय सी नेहरू युवा केंद्र बैंका रजिस्ट्री ऑफिस ट्रेझरी ऑफिस जेल महिला बाल कल्याण ऑफिस पोलिस मुख्यालय बांधकाम विभाग शाळा महाविद्यालय आय टी आय दवाखाने डॉ बाबासाहेब अम्बेडकर भवन रेस्ट हाउस चंपावती क्रीड़ा मंडळ हॉस्टल विक्रीकर भवन दारू बंदी ऑफिस ग्रंथालय ऑफिस वसंतराव विकास महामंडळ अशा शेकड़ो सरकारी खाजगी ऑफिस असून माजी मंत्री, आमदार  नगराध्यक्ष व जिल्हाधिकारी यांचे घर असून सुद्धा शहराचे नगराध्यक्ष व आमदार यांचे या नगर रोडकड़े एवढे दुर्लक्ष का? या भागामध्ये माणसं राहत नाही का, या प्रश्नाचे उत्तर दोघा काका पुतन्यांनी जनतेला द्यावे अशी मागणी लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी केली असून शाहू नगर मोमिन पूरा इस्लाम पूरा मोहम्मदीया कॉलनी शहीनशाह नगर जूनाबाजार कारंजा रोड भाजी मंडई बुंदेल पूरा अजीज पूरा शहरातील अनेक रस्त्यांची हिच अवस्था आहे शहरात जिकडे तिकडे घानाच घान आहे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट आहे त्यांचा बंदोबस्त प्रशासनाने लवकरात लवकर करावा कारण मोकाट कुत्रे लहान मुलांना चावत आहे यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. जिल्हाधिकारी साहेबांना भेट घेवून निवेदन देवू व लवकर सम्बंधितांना जिल्हाधिकरी यांनी निर्देश देवून कामे करुन घ्यावी नसता लोकसेना संघटना जनआंदोलन उभारणार असा इशारा लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी प्रसिद्धि माध्यमाद्वारे जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
                                 
                   
           

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा