Subscribe Us

header ads

महिला अंमलदारास अश्लील मेसेज पाठवून ब्लॅकमेल करणारा अंमलदार निलंबित

बीड स्पीड न्यूज 

महिला अंमलदारास अश्लील मेसेज पाठवून ब्लॅकमेल करणारा अंमलदार निलंबित



बीड | प्रतिनिधी -:  महिला अंमलदारस अश्लील मेसेज पाठवून ब्लॅकमेल करणाऱ्या अंमलदारास पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी 13 सप्टेंबरला निलंबनाचा आदेश दिला. माजलगाव येथे 10 सप्टेंबरला ही घटना घडली होती. हरिश्चंद्र खटाळ, असे निलंबित अंमलदाराचे नाव आहे. हरिश्चंद्र खटाळ व पीडित महिला अंमलदार ग्रामीण ठाण्यात कार्यरत आहे. 2021 पासून ते 27 ऑगस्ट 2022 पर्यंत हरिश्चंद्र खटाळ यांनी व्हाट्सअप मेसेज करून या महिलेस त्रास दिला. 8 सप्टेंबरला रात्री घरी येऊन माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा मी फाशी घेईन, असे धमकावून विनयभंग केला होता. त्यानंतर त्याची पोलीस पत्नी शिवकन्या निंगुळे हिने पैसे घेऊन प्रकरण  मिटवून टाक नाही तर तुझ्यावर,  तुझ्या नातेवाईकांवर 306  नुसार गुन्हा दाखल करून तुझी बदनामी करीन, तुला कुठे तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, अशी धमकी दिली होती.  पीडित महिला अंमलदाराच्या फिर्यादीवरून पो. कॉ. हरिश्चंद्र खताळ व पो. ना. शिवकन्या निंगुळे या दाम्पत्यावर शहर ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. गौरवर्तन केल्याचा ठपका ठेवून पो. कॉ.  हरिश्चंद्र खताळवर निलंबनाची कारवाई केली. 13  सप्टेंबर रोजी याबाबतचे आदेश काढल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा