Subscribe Us

header ads

मिल्लिया महाविद्यालयाने दिली दूध डेअरीला भेट

बीड स्पीड न्यूज 


मिल्लिया महाविद्यालयाने दिली दूध डेअरीला भेट

बीड: येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने पाली येथील बीड तालुका दूध डेअरीला (दुग्धालय) विद्यार्थ्यांची भेट आयोजित करण्यात आली होती. सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासक्रमात मिल्क मायक्रोबायोलॉजी (दूध सूक्ष्मजीवशास्त्र) हा एक महत्त्वाचा पेपर असल्याने ही भेट अभ्यासक्रमाचा एक भाग असल्याचे सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. सीमा हाश्मी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी दुधातील भेसळ, दुधाच्या गुणवत्तेचे मूल्यमापन कसे करायचे याबद्दल माहिती घेतली. तसेच गावकऱ्यांकडून दूध कसे गोळा केले जाते व नंतर त्यावर कशाप्रकारे प्रक्रिया केली जाते तसेच दुधापासून दही, लस्सी,पनीर व तूप निर्मिती कशी होते याची सखोल माहिती दूध डेअरी चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीखंडे यांनी दिली. यावेळी सूक्ष्मजीवशास्त्राचे डॉ. मोहम्मद असिफ इकबाल, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती. शैक्षणिक सहलीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहम्मद इलयास फाजील,उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस. एस. यांचे  मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा