Subscribe Us

header ads

माहीती अधिकार दिन कसा साजरा करायचा ; अधिकारी संभ्रमात

बीड स्पीड न्यूज 


माहीती अधिकार दिन कसा साजरा करायचा ; अधिकारी संभ्रमात 

बीड-; बीड जिल्ह्यातील प्रत्येक शासकिय कार्यालयात माहीती अधिकार दिन साजरा करा असे आदेश जिल्हा परिषद बीड आणि जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी शासकिय कार्यालयांना दिले आहेत. परंतू माहीती अधिकार दिन साजरा कसा करायचा याबाबत अधिकारी वर्ग संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. याबाबत अधिक माहीती अशी कि,बीड जिल्ह्यात माहीती अधिकार दिन साजरा करावा अशी मागणी  माहीती अधिकार कार्यकर्त्यानी प्रशासनाकडे केली होती. प्रशासनाने सदर मागणीची दखल घेत बीड जिल्ह्यातील सर्व शासकिय कार्यालयात माहीती अधिकार दिन साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. पंरतू माहीती अधिकार दिन साजरा करण्याबाबत बीड जिल्ह्यातील कोणत्या शासकिय कार्यालयाने माहीती अधिकार दिन निमित आयोजित कार्यक्रमाची माहीती प्रसार माध्यमांना आणि समाजिक/राजकिय /माहीती अधिकार/ कार्यकर्त्यांना दिलेली नाही त्यामुळे  माहीती अधिकार दिन कसा साजरा करायचा याबाबत अधिकारी संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. बीड जिल्ह्यातील माहीती अधिकार कार्यकर्ते माहीती अधिकार दिनानिमित आयोजित कार्यक्रमाची माहीती अधिकारात मागणार असल्याचे ही सागण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार "28 सप्टेंबर " हा दिवस आंतरराष्ट्रीय "माहिती अधिकार दिवस" म्हणून राज्यभर साजरा करण्यात यावा असा निर्णय शासनाने घेतलेला आहे या दिवशी स्पर्धा, निबंध, वकृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा तसेच व्याख्यानमाला " माहितीचा अधिकार " या विषयावर उपक्रम घेऊन सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये उपक्रम आयोजित करावेत तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते व इच्छुक गटांकरिता भित्तीपत्र, निबंध स्पर्धा, व्याख्यानमाला इ. आयोजित करून माहीती अधिकार दिन साजरा करावा असे आदेश शासनाचे आहेत. परंतू प्रशासकिय कार्यालयाकडून बीड जिल्ह्यात असे कोणतेही उपक्रम राबविले जात नसल्याचे ही बोलले जात आहे.



-----------------------------------------------------------------
माहीती अधिकार दिनानिमित सर्व कार्यालयांना मार्गदर्शक  सुचना द्याव्यात -;निलेश चाळक
-----------------------------------------------------------------

माहिती अधिकार दिवस " म्हणून साजरा करून माहितीच्या अधिकाराबाबत समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती, प्रचार-प्रसार करून नागरिकांपर्यंत पोचविण्याहेतू शासनाने  शासन निर्णय घेतला आहे व जिल्ह्यात हा उपक्रम व्यापक पातळीवर राबवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे बीड जिल्ह्यात माहीती अधिकार दिन साजरा कसा करायचा याबाबत अधिकारी व शासकिय कार्यालय संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे  जिल्हाधिकारी बीड यांनी बीड जिल्ह्यातील सर्व शासकिय कार्यालयात माहीती अधिकार दिन साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सुचना द्याव्यात अशी मागणी माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी केली आहे..



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा