Subscribe Us

header ads

दारूच्या नशेत दुचाकी चोरणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

बीड स्पीड न्यूज 


दारूच्या नशेत दुचाकी चोरणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या


बीड | प्रतिनिधी -: आजारी नातेवाईकास भेटण्यासाठी खाजगी दवाखान्यात आलेल्या शेतकऱ्यांची दुचाकी नगर नाका येथून लंपास केल्याची घटना 24  सप्टेंबर लगडली होती. शिवाजीनगर ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने 24 तासांत आरोपीच्या मुसक्या आवळून गुन्ह्याचा छडा लावला. दारूच्या नशेत त्याने गुन्हा केल्याचे तपासात समोर आले. गणेश विठ्ठल भांडवलकर (30, रा.संस्कार कॉलनी बीड ) असे आरोपीचे नाव आहे. (अरुण लक्ष्‍मण राऊत (रा. म्हाळसापूर ता. बीड.) हे दुचाकीवरुन (एम एच 23 व्ही -9673) आजारी मेहूण्यास भेटण्यासाठी शहरातील नगर नाका परिसरातील दवाखान्यात दि. 24  रोजी सकाळी 11 वाजता पत्नीसह आले होते. रुग्णाला भेटण्यासाठी ते आत गेल्यावर गणेश भांडवलकर याने दारूच्या नशेत त्यांची दुचाकी पळवली. राऊत हे रुग्णालय बाहेर आले असता दुचाकी गायब होती. 
त्यानंतर राऊत यांनी शिवाजी नगर ठाणे येथे दि. 25  रोजी गुन्हा नोंद केला. 


दुचाकी चोरणाऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज आधारे ठोकल्या बेड्या

उपअधीक्षक संतोष वाळके, पो.नि. केतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, हवालदार फेरोज पठाण, पो.ना. शेख मोहसीन, अंमलदार सुदर्शन सारणीकार, विलास कांदे, राम सानप यांनी सीसीटीव्ही फुटेज आधारे गणेश भांडवलकर यास बेड्या ठोकल्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा