Subscribe Us

header ads

आमा आदमी पार्टीचा परळी, केज विधानसभेचा. कार्यकर्ता मेळावा अंबाजोगाई येथे संपन्न

बीड स्पीड न्यूज 

आमा आदमी पार्टीचा परळी, केज विधानसभेचा. कार्यकर्ता मेळावा अंबाजोगाई येथे संपन्न                               

आम आदमी पार्टी नगरपंचायत राज निवडणूक संपूर्ण ताकतीने लढणार. -- सुग्रीव मुंडे संघटन मंत्री मराठवाडा विभाग. 


बीड | प्रतिनिधी -: बीड जिल्ह्यातील आम आदमी पार्टी  जिल्ह्यातील सर्व  निवडणुका लढणार असे मा. सुग्रीव मुंडे संघटन मंत्री मराठवाडा विभाग यांनी आज आंबेजोगाई येथे झालेल्या विधानसभेच्या कार्यकर्ता मेळाव्यात असे प्रतिपादन केले. हा कार्यक्रम प्रमुख पाहुणे सुग्रीव मुंडे संघटन मंत्री व माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांना आम आदमी पार्टीच्या विचारांसोबत सर्वसामान्य जनतेला जोडण्याचे आव्हान केले आहे. त्या अंतर्गत परळी व केज विधान सभेचा मेळावा आंबेजोगाई येथे घेण्यात आला या 

मेळाव्यासाठी युवा तरुण यांचे अधिक उपस्थिती होती. या उपस्थितीमध्ये मोठ्या संख्येने जनसामान्य नागरिकांचा देखील सहभाग होता या सर्वांनी आम आदमी पार्टीच्या विचारास प्रेरित होऊन आम आदमी पार्टीची कामे शिक्षण आरोग्य रोजगार दिल्लीमध्ये होत असलेले सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न विद्युत पाणी मोफत शिक्षा अशा मूलभूत सुविधांसाठी महाराष्ट्रातील नागरिक व बीड जिल्ह्यातील नागरिक कार्यकर्ते आम आदमी पार्टीकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. असे सर्वसामान्य नागरिकांनी या मेळाव्यामध्ये आपले मत व्यक्त केले हा मेळावा मा. सुग्रीव मुंडे संघटन 

मंत्री मराठवाडा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला  नवीन जुन्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे, जिल्हा सचिव रामधन जमले, कैलास चंद पालीवाल, कोषाध्यक्ष आंबेजोगाई तालुका अध्यक्ष रामकृष्ण गुंडरे, केज तालुकाध्यक्ष नासिर खाजा मुंडे, परळी तालुकाध्यक्ष रमेश गुट्टे, सचिव अमोल शिंदे, बीड शहर अध्यक्ष सय्यद सादेक, वसंत मुंडे, गोविंद गीते, गोविंद केंद्रे, केशव केंद्रे, अतुल मुंडे, पवार माणिक, सतीश चौधरी, नंदकिशोर उबाळे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा