Subscribe Us

header ads

तीन महिने झाले तरी पिंपळनेर पोलिसांना चोरीचा तपास लागेना

बीड स्पीड न्यूज 

तीन महिने झाले तरी पिंपळनेर पोलिसांना चोरीचा तपास लागेना

पिंपळनेर | प्रतिनिधी-: बीड तालुक्यातील मौजे कुक्कडगाव आणि चव्हाणवाडी येथे ३ जुलै रोजी एकाच दिवशी दुपारी दोन्हीं गावात चोरीच्या घटना घडल्या होत्या चव्हाणवाडी येथिल वस्तीवरील घरातील सोने आणि नगद रकमेसह जवळ पास पन्नास हजाराची चोरी झाली तसेच दुसरी घटना याच परिसरातील मौजे कुक्कडगाव येथील अप्पासाहेब देवराव चक्रे हे कुटुंबासोबत आपल्या शेतात राहतात यांच्या शेतातील घराचे कुलूप तोडून दोन ग्राम सोन्याचे मनी. किंमत १०४०० पायातील जोडवे किंमत २००० हजार रूपये आणि नगद ३०.००० असे ऐकुन ४२४०० मुद्देमाल चोरी झाला होता. त्याचं दिवशी पिंपळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु पिंपळनेर पोलीसांना आणखीन कोणताही चोर हाती लागलेला नाही तीन महिन्यात जर चोरीचा तपास लागतं नसेल तर जनतेने कोणाकडे मदत मागायची हा मोठा प्रश्न आहे. काही घटनेत पोलिसांना पुरावा मिळून आला तरी ही पिंपळनेर पोलीसांनी कोणतीही कारवाई केली नाही परत कुक्कडगाव येथे दोन दिवसापूर्वी आणखीन एक चोरीची घटना घडली आहे. जनरल स्टोर्स मधील रोख रकमेसह काही सामान चोरी गेले तरीही पिंपळनेर पोलिस हातावर हाथ धरुन बसले आहेत. आता आणखीन किती चोरीच्या घटना घडू द्यायच्या असा सवाल या भागांतील नागरीक करतं आहेत. आणखीन चोरट्यांना किती घर लुटून द्यायची असा सवाल नागरीक करत आहेत. सतत  होणाऱ्या चोऱ्या पाहता या भागात भीतीचे वातावरण आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा