Subscribe Us

header ads

सामाजिक बदल घडविणे जिवनाचे अंतिम ध्येय! डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण

बीड स्पीड न्यूज 



सामाजिक बदल घडविणे जिवनाचे अंतिम ध्येय! डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण  

बार्टी व मराठी पुरोगामी पत्रकार संघाची परिषद


बीड /  प्रतिनिधी-: कोणतेही काम उभा करत असताना सकारात्मक भूमिका आणि धोरणात्मक नियोजन तुमच्याकडे असेल तर मार्ग आपोआप खुले होतात. त्यासाठी संघर्षाचा एक प्रदीर्घ काळ लागतो.माणसाच्या आत्मकेंद्रित जीवन जगण्याला कवडीची देखील किंमत नसते .त्यामूळे माणसाने नेहमीच समाज केंद्रित जीवन जगले पाहिजे .कारण त्यातून एक सामाजिक बदल घडत असतो. एवढेच नव्हे तर माझ्या नोकरीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यंत समतेला अभिप्रेत कार्य करत राहणार आहे. सिर्फ हंगामा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। असे परिवर्तनिय विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रक्षिक्षण संस्था (बार्टी ) पुणे, विभाग प्रमुख डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी व्यक्त केले. मराठी पुरोगामी पत्रकार संघ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रक्षिक्षण संस्था (बार्टी ) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पत्रकारांची पुणे येथे परिषद आयोजित करण्यात आली होती. ही परिषद बार्टीच्या सभागृहात पार पडली. यावेळी  मराठी पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर काश्यप, उपाध्यक्ष भगवान पगारे, सचिव विजय गायकवाड, बिडीएस डॉ.विजय कदम, खादी व ग्रामउद्योग मंडळ, उद्योग विभाग मंत्रालय मुंबईचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, प्रियदर्शी तेलंग आदी मान्यवर उपस्थित होते. पत्रकार बांधवांना संबोधित करतांना डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण म्हणाले की, जो डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी व चळवळीशी बेईमान झाला त्याला समाज कदापी माफ करत नाही. तसेच नोकरीत असताना माझे समाजाप्रती काय उत्तरदायित्व होते याबद्दल माझ्या आयुष्याच्या अंतिम समयी बाबासाहेबांना कोणत्या तोंडाने उत्तर देऊ, याचे आत्मचिंतन महत्वाचे आहे.असे विचार डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी व्यक्त केले. या परिषदेचे  प्रास्ताविक  पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर कश्यप यांनी केले.सूत्रसंचालन मंत्रालय प्रतिनिधी  राहुल पहुरकर, आभार  भगवान पगारे यांनी केले. दरम्यान या परिषदेला बीड येथून सुनिल डोंगरे, रोहिदास हातागळे, अनिल गायकवाड, नवनाथ कांबळे, गौतम औसरमल यांनी सहभाग नोंदवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा