Subscribe Us

header ads

काशीमधाील घाटांची माहिती आता पुस्तक रुपाने!

बीड स्पीड न्यूज 


काशीमधाील घाटांची माहिती आता पुस्तक रुपाने!

 डॉ. अनिल बारकुल लिखीत ‘काशीधाम’ पुस्तकाचे आज प्रकाशन


प्रतिनिधी| बीड-: हिंदुचे पवित्र तिर्थक्षेत्र म्हणजे काशी शिवाय, याची वेगळी ओळख म्हणजे काशीतील विविध घाट. याच घाटांची सर्व माहिती बीड येथील डाॅ. अनिल बारकुल लिखीत काशीधाम या पुरस्काच्या माध्यमातून एकत्रित स्वरुपात पहिल्यांदाच भाविकांसाठी समोर येत आहे. अाज मंगळवारी पर्यटन दिनाचे औचित्य साधून या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. काशी या तिर्थक्षेत्राला हिंदु धर्मियांमध्ये पवित्र मानले जाते. काशी विश्वेश्वर या भगवान शंकराच्या मंदिरासह गंगानदी इथे असल्याने पौरािणक महत्व आहे. पूर्वजांना मुक्ती मिळावी यासाठी काशीच्या गंगातिरी पिंडदान करण्यालाही मोठे महत्व दिले गेले आहे. त्यामुळेच देशभरातून इथे भाविक विश्वेश्वराचे दर्शन, पूर्वजांचे पिंडदान, गंगेची सांयकाळी होणारी आरती पहाण्यासाठी येत असतात. शेकडो वर्षांपासून काशीतील विधींना महत्व असल्याने हे विधी करण्यासाठी इथे येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी काशीत गंगेच्या तिरी घाट बांधण्यात आले आहेत. अनेक राजे, संस्थानिकांसह अनेक मोठ्या व्यक्तींनी इथे घाटांची निर्मिती केली आहे. त्यामुळे काशीच्या पर्यटनात घाटांचे पर्यटनही आता भाविकांसाठी महत्वाचे असते.
काशीतील प्रत्येक घाटाची रचना संुदर आहेच परंतु, प्रत्येक घाटाला आपला स्वत:चा एक इतिहास आहे. घाट निर्माणाची पार्श्वभूमी आहे. मात्र, काशीत फिरताना केवळ हे घाटच दाखवले जातात त्यांचे निर्माण कुणी केले, कधी केले, त्याचा इतिहास काय याची अनेकांना माहिती नसते. बीड येथील फिजीशिअन डॉ. अनिल बारकुल हे पर्यटनाची आवड असल्याने सातत्याने विविध ठिकाणांना भेटी देत असतात. डॉक्टरांच्या एका परिषदेच्या निमित्ताने डॉ. अनिल व डॉ. सुनिता बारकुल यांनी काशी येथे भेट दिली होती. दोन, चार दिवसांच्या वास्तव्याच्या काळात डॉ. बारकुल यांना या घाटांनी मोहित केले नसते तर नवल. त्यांनी या प्रत्येक घाटाची सखोल माहिती घेतली. त्याच्या निर्माणाचा इतिहास जाणून घेतला आणि ही माहिती संग्रहित केली. आता काशीधाम या पुस्तकाच्या माध्यमातून ही माहिती पुस्तक रुपाने एकत्रित समोर येत आहे. आज  मंगळवारी सायंकाळी ६ वाजता आयएमए हॉलमध्ये या पुस्तकाचे प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक गंमत भंडारी हे असणार आहेत तर, ज्येष्ठ संपादक दिलीप खिस्ती व आयएमएचे बीड अध्यक्ष डॉ. अनुराग पांगरीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
----

साठ घाटांची माहिती

या पुस्तकात एकूण ६० घाटांची माहिती दिली गेली असून पुस्तकाला प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांची प्रस्तावना आहे. बीडच्या आसावरी प्रकाशनाने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. प्रकाशनास उपस्थित राहण्याचे आवाहन केले गेले आहे.
------------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा