Subscribe Us

header ads

मिल्लियाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने साजरा केला राष्ट्रीय पोषण माह

बीड स्पीड न्यूज 


मिल्लियाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने साजरा केला राष्ट्रीय पोषण माह

बीड: येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने विविध उपक्रम घेऊन राष्ट्रीय पोषण माह साजरा केला. यामध्ये अंकुरित धान्य दिन, आंबलेले अन्नदिन,हिरवे पालेभाज्या दिन, सलाड सजावट स्पर्धा व गरीब लोकांना फळांचे वाटप करण्यात आले. सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. सीमा हाश्मी यांनी सांगितले की अंकुरित धान्य पौष्टिक व चविष्ट लागते म्हणून आहारात मोड आलेल्या धान्याचा उपयोग करावा यामुळे शरीराला प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळते. आंबलेले अन्न खाणे आपल्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे, आंबलेली पदार्थ तयार करण्यासाठी प्रामुख्याने यीस्टचा वापर केला जातो व ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते. हिरव्या पालेभाज्या आपल्या शरीरातील रक्त वाढविण्याचे काम करतात म्हणून हिरव्या पालेभाज्या खा आणि निरोगी जीवन जगा असे म्हणतात. निरोगी राहण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे रोज खूप सारी ताजी फळे खाणे. ताजी फळे खाल्ल्यामुळे आरोग्य सुदृढ राहते. निरोगी आयुष्यासाठी संतुलित आहाराचे महत्व सांगितले. आरोग्य हीच संपत्ती असून कॅल्शियम व हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी ऋतुनिहाय योग्य आहार घेतल्यास आरोग्य चांगले राहते असे सांगितले. एक सामाजिक जबाबदारी म्हणून काही गरीब लोकांना फळांचे वाटप करण्यात आले. सर्व कार्यक्रमास सूक्ष्मजीवशास्त्राचे विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला व डॉ. मोहम्मद असिफ इकबाल यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, उपप्राचार्य डॉ. हुसैनी एसएस यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे राष्ट्रीय पोषण माह साजरा केल्याबद्दल अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा