Subscribe Us

header ads

अभ्यासातील सातत्य हेच स्पर्धा परीक्षेतील यशाचे गमक; ज्योतीताई मेटे यांचे पुस्तक वाटप कार्यक्रमात प्रतिपादन

बीड स्पीड न्यूज 


अभ्यासातील सातत्य हेच स्पर्धा परीक्षेतील यशाचे गमक

ज्योतीताई मेटे यांचे पुस्तक वाटप कार्यक्रमात प्रतिपादन


बीड / प्रतिनिधी-: स्पर्धा परीक्षा करत असताना,अभ्यासातील सातत्य आणि चिकाटी  हेच स्पर्धा परीक्षेतील यशाचे खरे गमक आहे. त्यामुळे अभ्यासातील सातत्य यात खंड पडू देवू नका, अपयश आले म्हणून खचून जाऊ नका. स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी पुन्हा तयारीला लागा असे प्रतिपादन शिवसंग्रामच्या अध्यक्षा तथा सहकारी संस्था विभागीय निबंधक ज्योतीताई मेटे यांनी व्यक्त केले.बीड शहरातील सावंत प्लाझा, मित्र नगर चौकाजवळ शिवाजी नगर येथे बार्टी मार्फत सुरु असलेल्या सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे पोलीस भरती बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाटप तसेच मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ज्योतीताई मेटे बोलत होत्या. यावेळी संस्थेचे संचालक राहुल वाघमारे, सुहास पाटील,बबन माणिक, शेख निजाम, मनोज जाधव, राजेंद्र बहिर, योगेश शेळके, सचिन कोटूळे, विनोद कवडे, विजय सुपेकर, सचिन मेरूकर आदी मान्यवर उपस्थित होते.मोफत पुस्तक वाटपाच्या कार्यक्रमात  उपस्थितांना मार्गदर्शन करताना ज्योतीताई मेटे म्हणाल्या की, बीड येथील सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामुळे बीड जिल्हातील अनुसूचित प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना बँक, रेल्वे, एलआयसी व तत्सम स्पर्धा परीक्षा भरतीपूर्व प्रशिक्षण मिळाले. एवढेच नव्हे तर पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण मोफत मिळत असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा आणखीनच फायदा होत असून संस्थेचे संचालक राहुल वाघमारे यांनी उपलब्ध करून दिलेल्याने संधीचे  विद्यार्थ्यांनो सोने करा.असे मत ज्योतीताई मेटे यांनी व्यक्त केले. संस्थेचे संचालक राहुल वाघमारे म्हणाले की, विनायकराव मेटे साहेब सामाजिक कार्यकर्ते होते. माझ्या या शैक्षणिक कार्यात त्यांनी मार्गदशनपर सहकार्य करत बळ दिले. त्यांच्यातला स्नेह आम्ही कधीही विसरणार नाहीत असे मत राहुल वाघमारे यांनी व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील कर्मचारी वर्गाने मोठे परिश्रम घेतले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा