Subscribe Us

header ads

सिंहाचे प्रवेशद्वारे असणाऱ्या शंभर फुट लांब गुहेतून माँ वैष्णाे देवी प्रतीकृतीचे दर्शन; देखाव्याचे साेमवारी जिल्हाधिकारी शर्मा यांच्याहस्ते उद‌्घाटन

बीड स्पीड न्यूज 



सिंहाचे प्रवेशद्वारे असणाऱ्या शंभर फुट लांब गुहेतून माँ वैष्णाे देवी प्रतीकृतीचे दर्शन; देखाव्याचे साेमवारी जिल्हाधिकारी शर्मा यांच्याहस्ते उद‌्घाटन

बीडचा राजा न्यु गणेश मित्र मंडळाचा काेराेनानंतर बीडकरांसाठी अागळा वेगळा देखावा

बीड | प्रतिनिधी -: शहरामध्ये मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहुुन बीडचा राजा न्यु गणेश मित्र मंडळाने वेगळी अाेळख निर्माण केली अाहे. यंदाच्या गणेश उत्सवामध्ये सिंहाचे प्रवेशद्वारे असणाऱ्या शंभर फुट लांब गुफेतून माँ वैष्णाे देवी प्रतीकृतीचे दर्शनाचा देखावा साकारला अाहे. या देखाव्याचे उद‌्घाटन साेमवारी (दि. ५) रात्री अाठ वाजता जिल्हाधिकारी राधाबिनाेद शर्मा यांच्या हस्ते हाेणार अाहे. मंडळाचे मार्गदर्शक गिरीष गिलडा सांगितले की, सोमवारी ( दि.५ ) रात्री आठ वाजता शनी मंदिर गल्ली, विठ्ठल मंदिर चौक पेठ बीड येथे देखाव्याचे उद्घाटन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा पेठ बीड कृती समितीचे अध्यक्ष अमृत काका सारडा, राजयोग फाउंडेशन चे अध्यक्ष शुभम धुत यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत. बीड शहरामध्ये बीडचा राजा न्यु गणेश मित्र मंडळाची स्थापना १९५४ मध्ये झालेली अाहे. सध्या मंडळाचे हे ६८ वे वर्ष अाहे. मंडळाच्या माध्यमातून अनेक सामजिक उपक्रम राबवण्यात अालेले अाहे. दरवर्षी गणेश उत्सव थाटामध्ये साजरा करण्याची मंडळाची परंपरा अाहे. यंदाच्या वर्षी मंडळाने बीडकरांसाठी सिंहाचे प्रवेशद्वारे असणाऱ्या शंभर फुट लांब गुफेतून माँ वैष्णाे देवी प्रतीकृतीचे दर्शन देखावा साकारला अाहे. दाेन वर्षापुर्वी बर्फाणी बाबा अमरनाथ दर्शन  देखावा पाहण्यासाठी महिला – पुरुषांच्या रांगा हाेत्या. मंडळाने हा देखावा भाविकांसाठी माेफत ठेवला हाेता. बीडचा राजा न्यु गणेश मित्र मंडळाचा काेराेनानंतर बीडकरांसाठी अागळा वेगळा देखावा पाहण्याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे अावाहन बीड चा राजा न्यु गणेश मित्र मंडळ अध्यक्ष बबलू गिलडा, कार्याध्यक्ष विशाल शर्मा,  उपाध्यक्ष व्यंकटेश दोडे, सचिव सतीश पगारिया, कोषाध्यक्ष कृष्णा मुंदडा, सह नरेश मुंदडा, प्रगेश‌ कुलकर्णी, अभिजीत दोडे, फामजी पारिख, पुष्कर मुंदडा,  गोविंद शर्मा, गोपाल शर्मा, मयुर गिलडा, ऋषिकेश मुंदडा, श्रेयस गिलडा, राम पारिख, शाम पारिख, गोविंद शर्मा, गणेश लोंढे यांनी केले आहे.
-----
मंडळाचे उपक्रम व भाविकांचा सकारात्मक प्रतिसाद
बीडचा राजा न्यु गणेश मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्विकारलेली सामाजिक जबाबदारी अाणि भाविकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद हेच मंडळाचे यश अाहे. यातूनच मंडळ पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबवले जातात.  

- गिरीष गिलडा, मार्गदर्शन, बीडचा राजा न्यु गणेश मित्र मंडळ.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा