Subscribe Us

header ads

अखेर तो अनधिकृत बोर्ड हटवून त्या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा बोर्ड लावला ; निलेश चाळक यांनी केली होती मागणी

बीड स्पीड न्यूज 


अखेर तो अनधिकृत बोर्ड हटवून त्या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा बोर्ड लावला ; निलेश चाळक यांनी केली होती मागणी

बीड | प्रतिनिधी  -: जिल्ह्यातील गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात लावण्यात आलेला अनधिकृत बोर्ड काढुन टाकण्यासाठी माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी केली होती. तक्रारीची दखल घेत गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयीन प्रशासनाने तो अनधिकृत बोर्ड हटविला आहे व त्या बोर्डाच्या जागी लाचलुचपत पथकाचा दुरध्वनी चा बोर्ड लावण्यात आला आहे. याबाबत अधिक माहीती अशी कि,उप जिल्हा रुग्णालय गेवराई जि बीड येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दुरध्वनी क्रं आणि पत्ता यांचा बोर्ड लावलेला नाही गेवराई जि.बीड येथील उपजिल्हा रूग्णालय प्रशासनाने रुग्नालयातील कर्मचार्याने शासकिय शुल्का व्यतिरिक्त पैशाची मागणी केल्यास वैद्यकिय अधिक्षक यांच्याशी संपर्क साधावा अशा प्रकारचा बोर्ड रूग्णालयात लावण्यात आलेला सदर बोर्ड म्हणजे रूग्णालयातील पैशाची मागणी करणार्या कर्मचार्याना पाठीशी घालण्यासाठी लावण्यात आलेला आहे. शासकिय शुल्काव्यतिरीक्त पैशाची मागणी केल्यास संबधित कर्मचारी/अधिकारी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबधंक विभागाकडून कारवाई केली जाते परंतू अश्या बोर्ड लावल्यामुळे नागरिकांची तक्रार लाचलुचपत विभागाकडे जाणार नाही त्यामुळे उपजिल्हा रुग्नालय गेवराई जि.बीड येथील लावण्यात आलेला तो बोर्ड हटवून त्या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दुरध्वनी क्रं पत्ता यांचा बोर्ड लावण्यात यावा अशी तक्रार माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी जिल्हा शल्य चिकित्सक बीड यांच्याकडे टपालाव्दारे आणि ईमेलव्दारे केली आहे. तर जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे आपले सरकार पोर्टलवरून तक्रार केली होती तक्रारीची दखल घेत जिल्हा शल्य चिकीत्सक बीड यांनी वैद्यकिय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय गेवराई यांना सदर बोर्ड हटविण्याचे आदेश दिले होते. उपजिल्हा रुग्णालयीन प्रशासनाने सदर अनधिकृत बोर्ड हटविला आहे. व त्या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दुरध्वनी क्रंमाकाचा बोर्ड लावण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा