Subscribe Us

header ads

बोरदेवी येथील ४० वर्षीय तरुणाची आत्महत्या

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

बोरदेवी येथील ४० वर्षीय तरुणाची आत्महत्या




वाकनाथपुर|प्रतिनिधी-: बीड तालुक्यातील आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे कोणत्या ना कोणत्या कारणाने रोज आत्महत्या होत आहेत.अशीच घटना आज पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.बोरदेवी येथे राहणारा नानाभाऊ त्रिंबक नानावटे (वय ४० वर्ष ) हे काही दिसापासून घरातुन बेपत्ता होते खुप शोधुन देखिल ते मिळून आले नाही आणि आज दिनांक ४ सप्टेंबर वार रविवार रोजी सकाळी गावापासून एक ते दिड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तलावात नानाभाऊ यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना निदर्शनास आला लगेच ही माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्यात कळवण्यात आली घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय आगाव यांच्या मार्गदर्शनाखाली. खरात,बहिरवाळ,वायकर,मगर,करले,यानी घटनास्थळी जाऊन मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने पाण्याच्या बाहेर काढून शव विच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ही आत्महत्या दारूच्या नशेत केल्याची बोलले जाते 
नानाभाऊ त्रिंबक नानावटे यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा पत्नी असा परिवार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा