Subscribe Us

header ads

धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी बालाजी गुट्टेला अटक!

बीड स्पीड न्यूज 


धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी बालाजी गुट्टेला अटक!


परळी (प्रतिनिधी) : फेसबुक अकाउंटवरून मुस्लिमांबद्दल धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट केल्याने बालाजी गुट्टे विरुद्ध परळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरील व्यक्तीने त्याच्या फेसबुक अकाउंटवर धार्मिक भावना दुखावतील असा मजकूर टाकला होता. ही बाब लक्षात येताच परळी पोलिसांनी बालाजी गुट्टे याला अटक केली आहे.  नगरसेवक शरीफ रोशन शेख यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० २९५- अ आणि माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम २००८ च्या ६६ नुसार परळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा