Subscribe Us

header ads

श्री साईराम अर्बन मल्टीस्टेटकडून बोरवडे यांच्या वारसाला 11,000 हजार रुपयांची आर्थिक मदत.

बीड स्पीड न्यूज 

श्री साईराम अर्बन मल्टीस्टेटकडून बोरवडे यांच्या वारसाला 11,000 हजार रुपयांची आर्थिक मदत.

बीड | प्रतिनिधी -: श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट बीड चे मुख्य शाखेचे खातेदार बोरवडे आत्माराम नामदेव यांचे काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट चे अध्यक्ष मा. शाहिनाथ विक्रमराव परभणे साहेब यांनी संस्थेच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना 11,000/- आर्थिक मदत केली. मयताचे वारस पत्नी  बोरवडे किस्किंदा आत्माराम व मुलगा बोरवडे अविनाश आत्माराम यांच्याकडे  11,000/- आर्थिक मदतीचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष मा. शाहिनाथ विक्रमराव परभणे साहेब यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी संस्थेचे जनरल मॅनेजर तळेकर डी.बी.मुख्य शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री लाटे एस.व्ही.,कर्ज अधिकारी पंडित बी.एम.,आय टी अधिकारी शिंदे ए.एस. तसेच मुख्य कार्यालय व मुख्य शाखेचे कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा