Subscribe Us

header ads

शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस महत्वाचा - प्राचार्य डी.जी.निकाळजे

बीड स्पीड न्यूज 


शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस महत्वाचा - प्राचार्य डी.जी.निकाळजे

तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात शिक्षक दीन उत्साहात साजरा



बीड(प्रतिनिधी):-शिक्षक दिनानिमित्त तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय,बीड येथे पहिल्या शिक्षिका सावित्रीमाई फुले,भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलतांना प्राचार्य डी.जी.निकाळजे म्हणाले की,भारत देशामध्ये पहिल्यांदा महिलांसाठी सावित्रीमाई फुले यांनी शिक्षणाचे दार उघडे केले आणि स्त्रि शिक्षणाची चळवळ 

गतिमान केली. तसेच भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी दोन्ही महान व्यक्ती बद्दल कृतज्ञता व्यक्त करत प्राचार्य डी.जी.निकाळजे यांनी शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व आणि भविष्यातील 

पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस महत्वाचा असल्याचे सांगितले. तसेच प्रा.डॉ.योगिता लांडगे यांनी शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात असे मत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थी,विद्यार्थिनींनी सर्व शिक्षक, शिक्षिका यांना गुलाब पुष्प देऊन आदरभाव व्यक्त करून शिक्षण दीन साजरा केला. यावेळी प्रा.डॉ.विकास वाघमारे,प्रा.शिल्पा बोराडे,प्रा.पुनम डोळस,प्रा.स्वाती साबळे,प्रा.किशोर वाघमारे,प्रा.समीर मिर्झा,प्रा.अंकुश सुर्वे,क्लार्क परसराम जाधव,प्रवीण रंगदळ,संतोष चव्हाण,संजय धुरंधरे यांच्या सह सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा