Subscribe Us

header ads

मिल्लिया महाविद्यालयाने साजरा केला हरित दिवस

बीड स्पीड न्यूज 


मिल्लिया महाविद्यालयाने साजरा केला हरित दिवस

बीड: येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने हरित दिन (ग्रीन डे) साजरा केला. हरित दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू पृथ्वीबद्दल जागरूकता निर्माण करणे,हिरवाईचे संगोपन करणे व विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष लागवडीचे महत्त्व तसेच पर्यावरण विषयक जागृती निर्माण करणे हा आहे असे सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. सीमा हाश्मी यांनी सांगितले. हरित दिवस निमित्त सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी कडूलिंबाच्या रोपांची लागवड केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस एस., यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे व विद्यार्थ्यांचे हरित दिवस साजरा केल्याबद्दल अभिनंदन केले. कार्यक्रमास सूक्ष्मजीवशास्त्राचे डॉ. मोहम्मद असिफ इकबाल यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा