Subscribe Us

header ads

वाढोना येथे तालुक्यात प्रथम दिव्यांगाचा पाच टक्के निधी वाटप-- अशोक तनपुरे

बीड स्पीड न्यूज 


वाढोना येथे तालुक्यात प्रथम दिव्यांगाचा पाच टक्के निधी वाटप-- अशोक तनपुरे 

वाढोना -: परतुर तालुक्यातील वाढोना गावात पंधरावा वित्त आयोगाचा /राखीव पाच टक्के दिव्यांगाचा निधी वाटप करण्यासाठी दिव्यांगाचे बँक खात्यात वर्ग करण्यासाठी आज दिनांक 22/9/2022 रोजी वाढोना येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे कागदपत्रे घेऊन दिव्यांगाच्या खात्यामध्ये एकूण एकूण निधी 16400 रूपये व दिव्यांग लाभार्थी 12 आसुन यांच्या बँक खात्यात समप्रमाणात वर्ग करण्यासाठी दिव्यांगाचे कागदपत्रे सादर करून घेतले आहे. तरी ही रक्कम दहा दिवसात दिव्यांगाच्या बँक खात्यात जमा होईल असे आश्वासन वाढोना गावचे कर्तव्यदक्ष सरपंच सुरेश शेळके व ग्रामसेवक गजभारे साहेब यांनी दिले तसेच हा दिव्यांगाचा पाच टक्के राखीव निधी वाटप करण्यासाठी दिव्यांगासाठी अहोरात्र झटणारे एक प्रामाणिक नेतृत्व प्रहार संघटनेचे जिल्हा निरीक्षक अशोक तनपुरे यांनी हा पुढाकार घेतला. याबद्दल दिव्यांग बांधवांनी व भगिनींनी अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक सरपंच सुरेश शेळके तसेच ग्रामसेवक गजभारे साहेब यांचे आभार मानले व आनंद व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायतचे ऑपरेटर दीपक तनपुरे व विकास पाटोळे यांनी मदत केली यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य विष्णू तनपुरे, व अशोक झोपडे, दिगंबर तनपुरे, योगेश शेळके, भगवान शेळके, रामा शेळके, प्रल्हाद शेळके सोपान थिटे सिरपत साळवे रामेश्वर शेळके रमेश साळवे, शंकर जाधव, जालिंदर तनपुरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा