Subscribe Us

header ads

पंचायत समितीतील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या निष्क्रिय कामाबद्दल चौकशी करण्याची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

बीड स्पीड न्यूज 


पंचायत समितीतील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या निष्क्रिय कामाबद्दल चौकशी करण्याची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी                                                    


बीड/प्रतिनिधी/धारूर तालुक्यामध्ये बाल विकास प्रकल्प विभागाच्या निगराणीखाली तालुक्यातील अंगणवाडी मध्ये शालेय पोषण आहार खाऊचे ऑगस्ट महिन्यात वाटप करण्यात आले होते.त्यामध्ये दिलेल्या हरभरा या आहारामध्ये मोठ्या प्रमाणात किडे आल्या भुंगे लागलेला खाऊ बालगोपाळांना देण्यात आला त्याचप्रमाणे देण्यात आलेली साखर यामध्ये पाणी झाले होते असा निष्क्रिय आहार धारूर तालुक्यात वाटप झाला असून याप्रकरणी दुर्लक्ष करणारे लक्ष्मण कदम बाल विकास प्रकल्प अधिकारी धारूर पंचायत समिती यांच्या निष्क्रिय कामाबद्दल सखोल चौकशी करण्यात यावी या बाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडे अर्जाद्वारे मागणी करण्यात आली आहे,धारूर तालुक्यातऑगस्ट २०२२ या महिन्यात तालुक्यातील सर्व अंगणवाडी मध्ये देण्यात आलेला शालेय पोषण आहार यात हरभऱ्यात चक्क किड्यांचा खच तेच अन्न शिजवून व गहू साखर हे अतिशय निकृष्ट देऊन अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्याआरोग्याशी खेळ होत असल्याने याबाबत धारूर पंचायत समिती येथील लक्ष्मण कदम बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडी विभागातील पोषण आहार समन्धीत कंत्राटदारांशी संगणमत करून कदम यांचा आपल्या कामाबाबत  निष्काळीपणा करत असुन तालुक्यातीअंगणवाडीतील बाल गोपाळांच्या आरोग्या सोबत खेळ मांडला आहे पंचायत समितीच्या श्री लक्ष्मण कदम यांनी तालुक्यातअंगणवाड्यांना शालेय पोषण आहार वाटप करताना पूर्ण निकृष्ट दर्जचा हरभरा देऊन त्यात किडे देऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबत खेळ मांडला आहे या वेळी अधिकार्यांनी कुठलीही पहाणी न करता हा आहार अंगणवाड्यामध्ये निकृष्ठ हरभरा शिजवून त्यात किडे असताना अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना आहार खायाला दिला यामुळे तालुक्यातील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत.धारूर तालुक्यात पंचायत समिती विभागामार्फत अंगणवाडी विभाग या विभागाचे लक्ष्मण कदम बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या निगराणीखाली तालुक्यातील अंगणवाडीमध्ये शालेय पोषण आहार खाऊचे वाटप केले जाते मात्र यामध्ये तालुक्यात अनेक ठिकाणी अंगणवाडीतील बालगोपालांच्या खाऊ मध्ये चक्क किडे शिजवून त्या विद्यार्थ्यांना खाऊ घालण्याचा प्रकार होत आहे यामुळे या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तालुक्यातील विविध अंगणवाडीमध्ये
बीड जिल्हा परिषद मार्फत पंचायत समिती व पंचायत समितीमध्ये असलेला अंगणवाडी विभागातून लक्ष्मण कदम यांच्या निगराणी खाली धारूर तालुक्यात शालेय पोषण आहार व इतर खाऊचे वाटप केले जाते यामध्ये शासनामार्फत कंत्राट दिलेले असले तरी समन्धीत कंत्राटदारा सोबत हात मिळवणी करून तालुक्यात निकृष्ट दर्जाचं पोषण आहार देऊन यातून चांगल्या पद्धतीचा आहार न देता कमी किमतीत येणारा निकृष्ठ दर्जाचा आहार तालुक्यात अंगणवाड्यांना वाटप करणे यामध्ये किडे असो की इतर घाण याची तपासणी न करणे यामुळे बाल गोपालांच्या आरोग्याशी खेळ करण्याचे कारस्थान संबंधित कदम अधिकारी व कंत्रालदाराकडून केले जात आहे.या खाऊचे वाटप केलेल्या शालेय पोषण आहार मधील तालुक्यातील  गावामध्ये हरभरा या शिजवलेल्या कडधान्यावर यांचा खच दिसून आला आहे तोच आहार शिजवून नंतर त्यामध्ये हरभऱ्यातील घुगऱ्यावर मृत किडे दिसत आहेत यामुळे विद्यार्थ्यांच्या बालगोपालांच्या आरोग्याशी खेळ हे तालुक्याचे अधिकारी करत असून संबंधितावर कारवाई करावे अशी मागणी या तक्रार अर्ज वरून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबयांच्याकडे बालाघाटचा योद्धा संपादक गोवर्धन बडे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा