Subscribe Us

header ads

मिल्लिया महाविद्यालयात मतदान ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करणे अभियान

बीड स्पीड न्यूज 


मिल्लिया महाविद्यालयात मतदान ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करणे अभियान

बीड: येथील  मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग, निवडणूक साक्षरता क्लब व तहसील कार्यालय बीड  यांच्या संयुक्त विद्यमानाने  भारत  सरकारची  मतदान ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करणे या योजनेचे  दिनांक  08 सप्टेंबर 2022 गुरुवार रोजी उपतहसीलदार व्ही. के. धावने यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील  यांची उपस्थिती होती. बीड तहसीलचे उपतहसीलदार व्ही. के धावणे यांनी  महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी मतदान  ओळखपत्र आधार कार्डशी  लिंक करून घ्यावे असे आवाहन  केले. यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा निवडणूक साक्षरता मंचचे  नोडल अधिकारी डॉ. मोहम्मद खय्युम  फारोखी,  उपप्राचार्य सय्यद एच.के, उपप्राचार्य हुसैनी एस. एस. प्रा. शेख गफूर अहमद, प्राध्यापकवृंद व  विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची उपस्थित होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा