Subscribe Us

header ads

मुनव्वर सुलताना आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित

बीड स्पीड न्यूज 


मुनव्वर सुलताना आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित

बीड (प्रतिनिधी) - शहरातील बालेपीर भागात असलेल्या रोशनपुरा जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका मुनव्वर युसूफ सुलताना यांना एआयएसएफ च्या वैद्यकीय समितीकडून आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात पार पडला.मुनव्वर सुलताना या गेल्या ३० वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. सहशिक्षिका ते मुख्याध्यापिका पदापर्यंत त्यांचा प्रवास आहे. एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये प्रथम एक शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका म्हणून आपल्याकडून विद्यार्थ्यांसाठी, शिक्षणासाठी, शाळेसाठी आणि एकंदरीत शिक्षण क्षेत्रासाठी चांगल्यात चांगले योगदान कसे देता येईल या ध्यासाने त्या नेहमी झपाटलेल्या असतात. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची नोंद आतापर्यंत अनेक संस्थांनी, संघटनांनी घेऊन अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. यापैकी राजे यशवंतराव होळकर पुरस्कार, जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार, रोटरी क्लब चा आदर्श शिक्षिका पुरस्कार, मैत्री फाउंडेशनचा आदर्श शिक्षिका पुरस्कार असे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यांच्या कार्याची नोंद घेत एआयएसएफ वैद्यकीय समितीने त्यांना औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात सोमवार दिनांक ५ सप्टेंबर २०२२ रोजी वैद्यकीय समितीचे राज्याध्यक्ष डॉ. अमोल जाधव यांच्या हस्ते आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. पुरस्कार देताना डॉ. अमोल जाधव म्हणाले की, मुनव्वर सुलताना यांच्या हातून सेवानिवृत्त होईपर्यंत विद्यार्थी, शिक्षण, शाळा आणि शिक्षण क्षेत्रात अजून चांगली भरीव कामगिरी व्हावी व यापुढे ही त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले जावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा