Subscribe Us

header ads

सामाजिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाने शेतकऱ्यांचे नुकसान

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे


सामाजिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाने शेतकऱ्यांचे नुकसान


वाकनाथपुर | प्रतिनिधी-: जिल्ह्यात गेल्या वर्षापासून पाऊसाने प्रमाण वाढले आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे अनेक शेतकऱ्यांचे पीक पाण्याने वाहुन जात आहेत. सर्व अधिकारी या बाबीकडे दुर्लक्ष करत आहे अश्याच प्रकारे बीड तालुक्यातील मौजे पिंपळनेर येथिल शेतकऱ्याचे सामाजिक बांधकाम विभागाच्या हलगर्जी पणाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिंपळनेर शिवारात घाटसावळी रोड वर असणारा पुल हा नादुरुस्त आहे गेले तीन वर्ष झाले सामाजिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदन देऊन देखील बांधकाम विभाग कोणतेही काम करत नाही. बांधकाम विभागाचे अधिकारी येतात पाहणी करतात आणि आश्वासनं देऊन जातात तर परत येत नाहीत हा पुल नादुरुस्त असल्याने पांडूरंग गवळी यांच्या शेतात पाणी जमा होते. काल झालेल्या पावसाने या शेतकऱ्याचे एक हेक्टर शेत पाण्याखाली गेली आहे या शेतात पाणी जमा झाल्याने शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे. शेतातील पीक जळून चालले आहे आता या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर सामाजिक बांधकाम विभागाला जाग येईल का असा सवाल पिंपळनेर येथील सर्व शेतकरी करतं आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक