Subscribe Us

header ads

तंत्रशिक्षणाची महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाचे केंद्र -- प्राचार्य देशमुख

बीड स्पीड न्यूज 

तंत्रशिक्षणाची महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाचे केंद्र -- प्राचार्य देशमुख


...द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे हर्ष उल्हासात स्वागत.....

बीड | प्रतिनिधी -: तंत्रशिक्षणाची महाविद्यालये ही विद्यार्थ्यांची कौशल्य विकसित करणारी केंद्रे असल्याचे प्रतिपादन बीड येथील मराठवाडा कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे प्राचार्य सुधीर देशमुख यांनी केले. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अन्न व औषध 

प्रशासनाचे अधिकारी श्री. महेंद्र गायकवाड, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ नारायणराव थोरात सर उपस्थित होते.पुढे बोलताना प्राचार्य देशमुख म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये समन्वय घडवून आणणारा हा कार्यक्रम निश्चितच एकमेकांमध्ये सहकार्याची भावना निर्माण करणार आहे. विद्यार्थ्यांनी ठाम निर्णय घेऊन ध्येयाप्रती जाण्यासाठी अपार कष्ट, 

मेहनत घेण्याची तयारी ठेवावी तसेच आपल्यातील कला गुण विकसित ओळखून त्याला कौशल्याधिष्ठित बनवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी महाविद्यालय राबवीत असलेल्या अनेक उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना त्यांनी दिली. तसेच आय. टी. क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्याचा कानमंत्रही यावेळी त्यांनी दिला. 

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय महेंद्र गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत उच्च व तंत्रशिक्षणाची शिदोरी घेऊन विद्यार्थ्यांनी करिअर करिअर घडवण्याचा सल्ला दिला. तसेच शिक्षण तज्ञ नारायणराव थोरात सर यांनी कष्टातून, श्रमातून ज्ञानार्जन करून सामाजिक 

दायित्व जोपासण्याचा मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिला. यावेळी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे महाविद्यालयात स्वागत केले. तसेच मनोगतही व्यक्त केली. शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या वतीने सर्व शिक्षकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा 

सन्मानही करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियंका पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.ऋषिका सीकची यांनी केले .कार्यक्रमास प्रा. मीनाक्षी सिकची, प्रा. सचिन मुळे प्रा.स्वप्निल कुलकर्णी यांच्यासह सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा