Subscribe Us

header ads

बीडमधील नगर रोडच्या कामासह मूलभूत समस्यांसाठी खा. प्रितमताईंना निवेदन

बीड स्पीड न्यूज 


बीडमधील नगर रोडच्या कामासह मूलभूत समस्यांसाठी खा. प्रितमताईंना निवेदन

सलीम जहाँगीर यांच्यासह भाजप शिष्टमंडळ खा.प्रितमताईंना भेटले

बीड ( प्रतिनिधी ) शहरातील जालना रोड प्रमाणे नगर रोडचे काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात. ईदगाह ते नाळवंडी रोड ,  वेंकूटधाम मोंढा ते जालना रोड या रस्त्याचे काम सुरू करावे या सह शहरातील मूलभूत समस्या मार्गी लावण्याचे आदेश येथील यंत्रणेला द्यावेत अशी मागणी भाजप नेते सलीम जहाँगीर यांच्यासह शिष्टमंडळाने खा.प्रितमताईंकडे केली. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून तातडीने प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय दबंग खा. डॉ. प्रितमताई मु़ंडे यांना बुधवारी भाजपा बीड शहर वतीने निवेदन देण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते बालेपीर नगर रोड - चऱ्हाटा फाटा हा मुख्य रस्ता अतिशय खराब झाल्याने तात्काळ दुरुस्ती करावी. त्याचबरोबर पेठ बीड भागातील ईदगाह - नाळवंडी नाका रोड आणि वैकुंठधाम मोंढा-जालना रोड हा रस्ता करणे, मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईट चालू करणे, दररोज वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा करणे, शहरात दैनंदिन नालेसफाई करणे आदी मूलभूत नागरी सुविधा बाबत निवेदन सादर करण्यात आले. खा.प्रितमताई यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याशी सविस्तरपणे चर्चा केली. याबाबत लवकरच प्रशासकीय पातळीवर योग्य कायदेशीर कारवाई करुन निर्णय घ्यावा अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या. नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक ढाकणे यांना बोलावून आदेशित करतो असे यावेळी जिल्हाधिकारी यांनी खा.प्रितमताईंना बैठकीत सांगितले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र  मस्के, जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, संघटन सरचिटणीस देविदास नागरगोजे, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष सलीम जहाँगीर , जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत हजारी, तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर, चंद्रकांत फड, डॉ.लक्ष्मण जाधव , जगदीश गुरखुदे , दिपक मुंडे ,अनिल चांदणे , संदीप उबाळे ,संग्राम बांगर , सुनील मिसाळ , विलास बामणे ,शरद झोडगे , कपील सौदा ,संतोष राख , मुसा खान पठाण , नूरलाला खान , दीपक थोरात , भोसले आण्णासाहेब , शांतिनाथ डोरले , हनुमान मुळीक , प्रदीप बांगर , दत्ता परळकर , दिनेश डेंगे ,  महादेव नागरगोजे , हरीष खाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा