Subscribe Us

header ads

टोकवाडी ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा - गौतम आगळे

बीड स्पीड न्यूज 


टोकवाडी ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा -  गौतम आगळे  

परळी प्रतिनिधी / दि. ७ परळी तालुक्यातील टोकवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध विकास कामांमध्ये ग्रामसेवक व सरपंच यांनी संगणमताने दलित वस्तीचा निधी इतरत्र वळवून विकास कामे न करता अपहर केला असून २५, १५, या कामांमध्ये देखील अपहार केला गेला प्रकरणाची तृतीय पक्षाकडून इन कॅमेरा चौकशी करून ग्रामसेवकावर निलंबनाची कार्यवाही करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी  मा.विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद समोर दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी बारा वाजता अमरण उपोषण करण्यात येईल असे एका निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.त्याच्या माहिती संबंधित मंत्री व अधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.विकास कामासाठी आलेल्या निधीचा काम न करता कागदपत्रे तयार करून बोगस बिले उचलण्यात आले,असून मोठ्या प्रकरणात भ्रष्टाचार तसेच शासनाच्या निधीचा गैर व्यवहार होत आहे असे दिसून येत आहे .या टोकवाडी ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामाची सखोल चौकशी करून ग्रामसेवक सरपंच व दोषी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, म्हणून जिल्हा परिषद बीड  कार्यालया समोर साखळी उपोषण करण्यात आले होते. त्या मुळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या दालनात संयुक्त बैठक घेऊन सुनावणी झाली. सदरील बैठकीत ग्रामसेवक व सरपंच यांना पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला असे दिसून आले. रोजनामा मिळावा असे दिनांक २२/ ०८ /२०२२ रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. तसेच आम्ही लावलेल्या वकील यांनी सुध्दा लेखी तक्रार दाखल केली. त्यावर कुठलाच निर्णय मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी न  घेतल्या मुळे   दिनांक ०७/०९/२०२२ रोजी मा.विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांना एक निवेदन देण्यात आले. प्रकरणाचा निपटारा करावा अन्यथा मा. विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलेल्या निवेदनात दिला आहे. असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष तथा कामगार नेते भाई गौतम आगळे व परळी तालुका महासचिव विष्णू पंत मुंडे यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा