Subscribe Us

header ads

म्हाळस जवळा येथे विज पडून बैलाचा मृत्यु

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

म्हाळस जवळा येथे विज पडून बैलाचा मृत्यु



वाकनाथपुर | प्रतिनिधी-: शेतकऱ्यांवर हमेशा कोणते ना कोणते संकट येतं राहते कधी पाऊस पडत नाही म्हणुन पिके जळून जातात तर कधी अतिवृष्टी होऊन पिके वाहुन जातात शेतकरी हमेशा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असतो आणि कोणते नुकसान झाले तर लवकर नुकसान भरपाई मिळत नाही. बीड तालुक्यात गुरुवार च्या पहाटे विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला या पाऊसात तालुक्यांतील मौजे म्हाळस जवळा येथील शेतकरी अशोक राम कदम हे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कदम वस्ती येथे राहतात रात्री झालेल्या पावसात अशोक कदम यानी झाडाखाली बांधलेल्या बैलावर विज पडली विज पडल्याने अंदाजे किंमत ४५.००० रूपये किमतीचा बैलाचा जागीच मृत्यु झाला आहे. तरी अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून या शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. तसेच दुसरी घटना वाकनाथपुर शिवारात लिंबाजी खाकरे यांच्या जनावराच्या गोठ्याच्या काही अंतरावर देखील लिंबाच्या झाडावर विज पडली पण सुदैवाने तेथें कोणतेही नुकसान झाले नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा