Subscribe Us

header ads

नागरिकांनो लक्ष ठेवा : माहीती अधिकार दिन साजरा न झाल्यास तक्रारी करा निलेश चाळक यांचे आव्हान

बीड स्पीड न्यूज 


नागरिकांनो लक्ष ठेवा : माहीती अधिकार दिन साजरा न झाल्यास तक्रारी करा निलेश चाळक यांचे आव्हान

बीड | प्रतिनिधी -: राज्यात 28 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहीती अधिकार दिवस साजरा करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने माहीती अधिकार दिन साजरा करण्याचे आदेश यापुर्वीच दिले आहेत परंतु त्या आदेशाची अमंलबजावणी प्रशासनाकडून फक्त कागदावरच केली जात आहे त्यामुळे नागरिकांनो लक्ष ठेवा दि 28 संप्टेबर रोजी माहीती अधिकार दिन साजरा न झाल्यास तात्काळ संबधित अधिकारी कार्यालयाविरुध्द तक्रारी कराव्यात अथवा माझ्याशी संपर्क साधावा असे आव्हान माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी केले आहेयाबाबत अधिक माहीती अशी कि,महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय - केंमाअ - 2008/प्र. क्र. 378/08/ सहा. दिनांक - 20/9/2008. रोजी 28 सप्टेंबर " हा दिवस आंतरराष्ट्रीय "माहिती अधिकार दिवस" म्हणून राज्यभर साजरा करण्यात यावा असा निर्णय शासनाने घेतला आहे. या दिवशी स्पर्धा, निबंध, वकृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा तसेच व्याख्यानमाला " माहितीचा अधिकार " या विषयावर उपक्रम घेऊन सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये उपक्रम आयोजित करावेत तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते व इच्छुक गटांकरिता भित्तीपत्र, निबंध स्पर्धा, व्याख्यानमाला इ. आयोजित करून " माहिती अधिकार दिवस " म्हणून साजरा करून माहितीच्या अधिकाराबाबत समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती, प्रचार-प्रसार करून नागरिकांपर्यंत पोचविण्याहेतू शासनाने वरील संदर्भीय शासन निर्णय घेतला आहे दि 28 संप्टेबर रोजी नागरिकांनी लक्ष ठेवून आप आपल्या गावात जि,प शाळेत व ग्रां.प मध्ये किंवा तालूक्याच्या /शहराच्या शासकिय कार्यालयात माहीती अधिकार दिन साजरा होतो कि नाही यावर नागरिकांनी लक्ष ठेवावे व माहीती अधिकार दिन साजरा न झाल्यास तक्रारी कराव्यात अथवा 9834095532 या क्रंमाकावर सपर्क साधवा असे आव्हान माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा