Subscribe Us

header ads

मेटे साहेब,पत्रकार रईसखानचे निधन व अल्लाह, रसूल, क़ुरआन बद्दल सुरू असलेल्या उपद्व्यापामुळे वाढदिवस साजरा करणार नाही - जहीर अली शाह कादरी

बीड स्पीड न्यूज 


मेटे साहेब,पत्रकार रईसखानचे निधन व अल्लाह, रसूल, क़ुरआन बद्दल सुरू असलेल्या  उपद्व्यापामुळे वाढदिवस साजरा करणार नाही - जहीर अली शाह कादरी 


बीड (प्रतिनिधी) - केजीएन ग्रुप संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा महाराष्ट्र मुस्लिम शाह (फकीर) छप्पर बंद विकास मंडळ चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जहीर अली शाह कादरी यांनी दिनांक ११ सप्टेंबर रोजी येणारा  वाढदिवस यावेळी साजरा करणार नसल्याचे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कळविले असून वाढदिवस साजरा न करण्यामागे नुकतेच अपघाती निधन झालेले शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार विनायकराव मेटे आणि प्राध्यापक तथा पत्रकार रईसखान यांच्या दुःखद निधनामुळे तसेच अलीकडच्या काळात इस्लाम धर्मियांना डिवचण्यासाठी समाजातील काही कंटकांकडून जाणून बुजून अल्लाह, रसूल आणि कुरआन बद्दल सुरू असलेल्या उपद्व्यापाने व्यथित होऊन यावेळी आपण आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कळविले असून कुणीही आपल्याला वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा संदेश, हारतुरे, बुके, पेढे वगैरे आणू नये. तसेच कोणीही व कुठेही डिजिटल बॅनर ही लाऊ नये अशी विनंती केली आहे. जहीर अली शहा कादरी हे शहरातील एक सुसंस्कृत व सर्वधर्मसमभाव मानणारे मितभाषी व्यक्तिमत्व लाभलेले गोरगरिबांच्या अडीअडचणीत धावून जाणारे महिन्यातून एकदा गोरगरिबांना अन्नदान करणारे दरवर्षी पवित्र रमजान महिन्यात गोरगरिबांची ईद चांगली साजरी व्हावी म्हणून मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहेत. त्यांच्या या सर्व सामाजिक कार्यामुळे समाजातील अनेक गणमान्य व्यक्तींसह संपादक, पत्रकार, व्यापारी आणि सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसोबत त्यांचे सौहार्दतेचे संबंध आहेत. यामुळे अनेकांशी त्यांचे ऋणानुबंध जुळलेले आहेत. अशाच प्रकारे माजी आमदार विनायकराव मेटे यांच्यासोबत राजकीय नाही  तर भावनिक मित्रत्वाचे पारिवारिक असलेले संबंध व पत्रकार प्राध्यापक रईस खान यांच्यासोबतही त्यांची घनिष्ठ मित्रता होती. परंतु नुकतेच या दोघांचे अकस्मात निधन झाल्याने दोन चांगले मित्र गमावल्याचे शल्य त्यांच्या मनाला यातना देत आहेत. हे कमी होते की काय म्हणून काही दिवसांपासून इस्लाम धर्मियांना डिवचण्यासाठी समाजातील काही कंटक जाणून बुजून अल्लाह, रसूल आणि कुरआन बद्दल करत असलेल्या उपद्व्यापाने त्यांचे मन अत्यंत व्यथित झाले असून यामुळे यावेळी काही दिवसांवर आलेला वाढदिवस साजरा करायचा नाही असे ठरविले असून वाढदिवसादिनी किंवा अगोदर अथवा नंतर कुणीही आपल्याला शुभेच्छा संदेश, हारतुरे, पुष्पगुच्छ, पेढे वगैरे आणू नये व देऊ ही नये. शिवाय कोणीही व कोठेही डिजिटल बॅनर लावू नये. अशी विनंती जहीर अली शाह कादरी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा