Subscribe Us

header ads

रिलायन्स या कंपनीच्या अवैध कामांना अंबाजोगाई तालुक्यात कोणाचे वरदहस्त-- राजेश वाहूळे

बीड स्पीड न्यूज 


अंबाजोगाई प्रतिनिधी-: शेख फेरोज

रिलायन्स या कंपनीच्या अवैध कामांना अंबाजोगाई तालुक्यात कोणाचे वरदहस्त-- राजेश वाहूळे

अंबाजोगाई | प्रतिनिधी दि ८ -: अंबाजोगाई शहरामध्ये रिलायन्स कंपनीच्या वतीने जागोजागी केबल व प्लास्टिकचे खांब टाकण्याचे काम सुरू आहे. त्या केबलमुळे शहरात जाणाऱ्या मुख्य पाईपलाईन वारंवार फुटत आहेत व त्याची दुरुस्ती ही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना करावी लागत आहे. त्याला आठ ते दहा दिवस कालावधी लागत आहे या कालावधीमध्ये पूर्ण शहर पाण्याविना बसण्याची वेळ वारंवार येत आहे. मागील दहा दिवसापासून शहरात जाणाऱ्या मुख्य पाईपलाईन जवळपास तीन ठिकाणी कट झालेले आहेत याची दखल कुठलाच प्रशासकीय अधिकारी घेत नसल्यामुळे लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने जर या संबंधित एजन्सीवर कारवाई केली नाही तर लोक जनशक्ती पार्टी युवा च्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची नोंद प्रशासनाने घ्यावी. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा