Subscribe Us

header ads

मिल्लिया महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा

बीड स्पीड न्यूज 


मिल्लिया महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा

बीड: येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात  दिनांक 24 सप्टेंबर 2022, शनिवार रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. ओमप्रकाश झंवर, कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी  महाविद्यालयाचे  उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर डॉ. मिर्झा असद  बेग, डॉ.शेख रफिक. प्राध्यापिका डॉ.शेख एजाज परवीन, पदव्युत्तर संचालक प्रा. फरीद नेहरी आयक्यूएसी समन्वय डॉ.अब्दुल अनीस यांची उपस्थिती होती.
प्रमुख अतिथी डॉ. ओमप्रकाश झंवर यांनी "राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका"(Role of a students in NSS) या विषयावर व्याख्यान दिले. युवक हे आपल्या देशाचे भविष्य असून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक जबाबदारीची जागृती व्हावी. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी असे सांगितले. कार्यक्रमाची अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विविध उपक्रम घेते.विद्यार्थ्यांनी श्रमदान, जलसंवर्धन,स्वच्छतेचे महत्व समजून घ्यावे व त्याचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करावा असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर मिर्झा असद बेग यांनी  तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी डॉ. शेख रफिक यांनी केले.याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा