Subscribe Us

header ads

मिल्लिया महाविद्यालयाची अन्सारी अफिफा निशात गणित विषयात विद्यापीठात प्रथम

बीड स्पीड न्यूज 


मिल्लिया महाविद्यालयाची अन्सारी अफिफा निशात गणित विषयात विद्यापीठात प्रथम

बीड: येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाची बीएस्सी तृतीय वर्षाची  विद्यार्थिनी अन्सारी अफिफा निशात अब्दुल नईम हिस गणित विषयात सर्वात जास्त गुण मिळाल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्यातर्फे श्री. दत्तात्रय मोरेश्वर दातार व श्री कृष्णराव देशपांडे साखरीकर पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सलीम बिन महाफुज, सचिव श्रीमती खान सबीहा मॅडम, सहसचिव हाश्मबीन अहमद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस एस., गणित विभाग प्रमुख प्रा. मोमीन फसीयोद्दीन, प्राध्यापिका फर्रा फातिमा नहरी, सर्व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा