Subscribe Us

header ads

शिक्षक, कुटूंबप्रमुखांपुढे मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्याचे आव्हान : सीईओ अजीत पवार

बीड स्पीड न्यूज 

शिक्षक, कुटूंबप्रमुखांपुढे मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्याचे आव्हान : सीईओ अजीत पवार

राेटरी क्लब ऑफ बीड सेंट्रलचा पदग्रहण आणि सन्मान राष्ट्रशिल्पकारांचा उपक्रम उत्साहात

बीड | प्रतिनिधी -: पुर्वी शिक्षकांच्या ताब्यात मुलांना दिले जात होते, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. परिणामी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी पालकांसह शिक्षकांना कसरात करावी लागत आहे. मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्याचे आव्हान सर्वांपुढे निर्माण झाले आहे. त्याच बराेबरच वातावरणासह पर्यावरणातील बदलांमुळे कधी तरी कुठे किंवा एकाद्याला झालेले कॅन्सर सारखे आजरही आता माेठ्याप्रमाणावर वाढत आहेत. त्यामुळे कॅन्सर आणि माेबाईलपासून येणारी नवी पिढी सुरक्षीत करण्यासाठी राेटरीसह अनेकांनी एकत्र येऊन चळवळ म्हणून समाजात काम करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार यांनी व्यक्त केले. दरम्यान खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी क्लब च्या नुतन 

कार्यकारिणीसह पुरस्कार प्राप्त शिक्षकांना व्हाईस मेसेज द्वारे शुभेच्छा दिल्या. राेटरी क्लब ऑफ बीड सेंट्रल अायाेजित नुतन अध्यक्ष, सचिव व संचालक मंडळाचा पदग्रहण साेहळा आणि सन्मान राष्ट्रशिल्पकारांचा कार्यक्रम शहरातील हाॅटेल अन्वीता सभागृह येथे गुरुवारी (दि. २२) राेजी सायंकाळी सात वाजता आयाेजित करण्यात आला हाेता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार, प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी अदित्य जिवने, उपप्रांतपाल उमाकांत थाेरात, चार्टर प्रेसीडेंट संदेश लोळगे, क्लब ट्रेनर गणेश वाघ, प्राेजेक्ट चेअरमन सुहास बेदरे, ज्ञानेश्वर तांबे उपस्थित हाेते. यावेळी क्लबचे २०२१-२२ चे अध्यक्ष अजय घाेडके व सचिव महेश जाेशी यांनी नवीन वर्ष २०२२-२३ चे अध्यक्ष परमेश्वर जाधव, 

सचिव रवी उबाळे यांच्याकडे पदभार साेपवला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रशिल्पकारांचा सन्मान करण्यात आला. सीईओ पवार म्हणाले, निस्वार्थी, राजकारण विरहित अशी रोटरी क्लब आहे. बीड जिल्ह्यात २३ हजार शिक्षक बीड जिल्ह्यात कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेमार्फत पुरस्काराने शिक्षकांचा गाैरव केला जाताे. तसेच सामाजिक संघटनांकडून शिक्षकांचा गाैरव ही काैतुकास्पद बाब आहे. हेच शिक्षक बीड जिल्ह्याच्या विकासासाठी भावी पिढी तयार करतील. त्याच बराेबर भविष्यातील १० - १५ वर्षांनंतर ऑक्सिजन टंचाई सारख्या गंभीर समस्यांपासून मुक्त रहाचे असेल तरच चळवळ करुन वृक्षाराेपन, संगाेपन, माेबाईल मुक्त मुले-कुटूंब, मैदानी खेळ यासह विविध उपक्रमांच अवलंब दैनंदिन जिवानात करावा लागेल. सहाय्यक 

जिल्हाधिकारी जिवने म्हणाले, शिक्षक हे राष्ट्र निर्माण करत असतात. शिक्षक हे जिवन घडवतात. ज्या पदावर आपण काय करायचं हे ओळखून घेतात. माझे वडील प्राध्यापक आई शिक्षिका आहे.त्यांनी कधीच हे करिअर कर असे बंधन लादले नाही. मुलांना नव नवीन कल आणि स्पर्धा परीक्षा देता यावेत अशी त्यांची मानसीकता तयार हाेणे गरजेचे आहे. त्यांच्यावर प्रेशराईज करुन चुकीचे आहे. जग बदल आहे. त्यामुळे बारावी पर्यंत मुलांना त्याला शिकू द्यावी सक्ती करु नये. ज्या ज्या वेळी जे करायचे ते करा, थांबु नका चुका होईल मात्र घाबरून जाऊ नये. सर्व शिक्षणाच्या सारं म्हणजे करिअर असते असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास क्लबचे ज्ञानेश्वर तांबे, गणेश वाघ, कचरु चांभारे, अजय घाेडके, गिरीष गिलडा, मुकेश आग्रवाल, महेश जाेशी, अभिनंदन कांकरीया, सुहास बेदरे, समाधान कुलकर्णी, डाॅ. सुहास धुमाळ, डाॅ. सचीन वारे, सुशील अब्बड, उमेश संचेती, प्रितेश संचेती, राजीव संचेती, अतुल जाजू, संदीप डाेंगरे, प्रमाेद करमाळकर, प्रदीप मालपाणी, हेमंत बडवे, डाॅ. शाम चरखा, नितीन सारडा, विश्वास शेंडगे यांच्यासह सर्व बाेर्ड ऑफ डायरेक्टर, क्लबचे सदस्य व पदाधिकारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

या शिक्षकांचा करण्यात आला गाैरव

कुरवडे नवनाथ बाजीराव स.शी. जि. प. उच्च प्राथमिक शाळा कन्या पिंपळनेर, अंकुश चंद्रकांत डाके स.शी .जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोळदगाव, अश्विनी वासुदेव टेकाळे (सह शिक्षिका )चंपावती माध्यमिक विद्यालय बीड, पंजाबराव सर्जेराव सोन्ने स.शी .जि प उच्च प्राथमिक शाळा आहेर वडगाव ता. बीड., रोहिणी आबासाहेब गीते (सहशिक्षिका )माईलस्टोन प्रायमरी स्कूल बीड., अशोक कारभारी खेडकर सहशिक्षक जि.प. प्रा.शाळा भगवाननगर वस्ती राळेसांगवी ता. शिरूर, राजेंद्र सुधाकर कुऱ्हे मुख्याध्यापक कामखेडा हायस्कूल कामखेडा. ता बीड.,गोवर्धन नवनाथराव पवार स. शि.यशवंत माध्यमिक विद्यालय बीड., आजिनाथ बबनराव हाडुळे .सहशिक्षक जि. प. केंद्रीय प्रा. शाळा वांगी ता. बीड, पांडुरंग आबासाहेब गवते सहशिक्षक जि.प.प्रा. शाळा मोहनगिरवाडी ता. बीड, शेख खालेद शहेजामेमियॅा सहशिक्षक जि .प .केंद्रीय प्रा. शाळा नाथापुर ता . बीड, विनोद प्रल्हादराव डंबरे (सहशिक्षक )शिवाजी विद्यालय बीड, अंबिका बळीराम बगाडे सशी जि. प. उच्च प्रा कन्या शाळा पिंपळनेर, अशा दिनकर कदम मुख्याध्यापिका कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जातेगाव तालुका गेवराई, कल्पना गणपतराव जाधव जि .प. प्रा. शाळा भेंड (खुर्द )ता. गेवराई, सविता राधाकिसन दिवे सशी गजानन विद्यालय राजुरी( न.), प्रीती कमलेश सिक्करवार सहशिक्षकी गुरुकुल इंग्लिश स्कूल बीड, शेख खालेद शहेजामेमियॅा सहशिक्षक जि .प .केंद्रीय प्रा. शाळा नाथापुर ता . बीड, विनोद प्रल्हादराव डंबरे (सहशिक्षक )शिवाजी विद्यालय बीड, अंबिका बळीराम बगाडे सशी जि. प. उच्च प्रा कन्या शाळा पिंपळनेर, अशा दिनकर कदम मुख्याध्यापिका कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जातेगाव तालुका गेवराई,कल्पना गणपतराव जाधव जि .प. प्रा. शाळा भेंड (खुर्द )ता. गेवराई, सविता राधाकिसन दिवे सशी गजानन विद्यालय राजुरी( न.), प्रीती कमलेश सिक्करवार (सहशिक्षिका) गुरुकुल इंग्लिश स्कूल बीड यांचा सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा