Subscribe Us

header ads

परळीत चारचाकी वाहना सोबत लाखोंचा गुटखा जप्त

बीड स्पीड न्यूज 

परळीत चारचाकी वाहना सोबत लाखोंचा गुटखा जप्त

अपर  पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या पथकाची कारवाई

परळी | प्रतिनिधी -: अंबाजोगाई च्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना गुप्त माहिती मिळताच यांच्या पथकाने परळी शहरात गुटखा विक्री करणाऱ्या चार चाकी वाहनावर कारवाई केली. या कारवाईत ६०  हजाराच्या गुटख्यासह चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या करवाई वेळी एकास ताब्यात घेण्यात आले असुन अन्य एक आरोपी फरार झाला आहे ही कारवाई आज दुपारी करण्यात आली. परळी शहरात बेकायदेशीर गुटखा विक्री होत असल्याची गुप्त माहिती कविता नेरकर यांना सोमवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी मिळाली असता  कविता नेरकर यांच्या पथकाने परळी शहरातील विद्यानगर भागात नामदेव रघुनाथ मुंडे यांचा घरासमोर एक टेम्पो उभा उभा असल्याचे निदर्शनास आला या टेंपो मधुन बेकायदेशीर गुटखा विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या पथकाने विविध प्रकारचा ६० हजाराचा गुटखा आणि टेंपो क्रमांक एम एच  ४४ यु ०५८५ असा चार लाखाचा माल ताब्यात घेतलं ही कारवाई सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पोलीसांनी सदर चौकशी केली असता हा गुटखा गफ्फार मुकदुम शेख यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगण्यात आले पोलीसांनी घटनास्थळावरून नामदेव मुंडे यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पो. ह. अनिल दौड यांच्या फिर्यादीवरून नामदेव मुंडे आणि गफ्फार शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अपर अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुजाता शिंगाडे, मेंडके, पो कर्मचारी दौंड, तागड, देवकते, राऊत, खंदारे, यांनी पार पाडली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा