Subscribe Us

header ads

डॉ.कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्काराने सामाजिक कार्यकर्ते रहेमान सय्यद सन्मानित

बीड स्पीड न्यूज 


डॉ.कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्काराने सामाजिक कार्यकर्ते रहेमान सय्यद सन्मानित

मंगेश चिवटे विषेश कार्यकारी अधिकारी,संजय आवटे संपादक लोकमत पुणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान 

कडा (प्रतिनिधी) कडा ता.आष्टी जि.बीड येथिल सामाजिक कार्यकर्ते , शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख,पत्रकार सय्यद रहेमान सय्यदअली यांच्या कार्याची दखल घेत संयोजक काशिनाथ भतगुणकी संस्थापक अध्यक्ष,व सौ.संगीता पाटील संस्थापिका सचिवा,ड्रिम फाउंडेशन यांनी पुरस्कार निवडीचे पत्र दिले होते.पुणे येथे ड्रिम फाउंडेशन तर्फे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन भारत रत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सरांच्या ९१ व्या जयंती औचित्याने ड्रिम फाउंडेशन व डॉ.कलाम मिशन आयोजित डॉ.कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात आले. पुणे येथिल बालगंधर्व रंगमंदिर येथे दि.१८ आँक्टोबर मंगळवार रोजी दुपारी पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते,शेतकरी संघटनेचे बीडजिल्हा प्रसिध्दी प्रमुख,पत्रकार रहेमान सय्यद यांना मंगेश चिवटे कक्ष प्रमुख मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी विषेश कार्याधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडि,व संजय आवटे संपादक लोकमत पुणे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी अंकुश शिंदे आयपीएस पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी उपसंचालक यशदा पुणे, डॉ.बबन जोगदंड प्रभारी अधिकारी (प्रकाशन) यशदा पुणे, नवनाथ येवले डायरेक्टर येवले अमृततुल्य,दत्तात्रय निडवंचे डायरेक्टर नादब्रम्ह इडली, चंद्रकांत निनाळे सहसंचालक शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय पुणे आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच ड्रिम फाउंडेशन,डा.कलाम मिशनची पुर्ण टीम व असरार सय्यद,अजहर पानसरे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिनाथ भतगुणकी यांनी केले.रहेमान सय्यद यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व केलेल्या कार्याचे कौतुक करत शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दिन,ग्रा.प.सदस्य बंटी गायकवाड,प्रतापसिंग परदेशी, मिलींद देशमुख,बाबु तारु,सागर बोराटे,अल्ताब शेख सह युवराज गणेश मित्र मंडळ कडा यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा