Subscribe Us

header ads

आदर्श शिक्षक सौदागर कांदे हे विद्यार्थीप्रिय शिक्षक- सुरेश (नाना) फड

बीड स्पीड न्यूज 


आदर्श शिक्षक सौदागर कांदे हे विद्यार्थीप्रिय शिक्षक- सुरेश (नाना) फड

महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी सौदागर कांदे यांची निवड

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बीड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सौदागर आबाजी कांदे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक  पुरस्कार हा परळीसाठी गौरवाची बाब असुन सौदागर कांदे हे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणुन सर्वपरिचित असल्याचे उद्योजक सुरेश नाना फड यांनी सांगितले.परळी तालुक्यातील दगडवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे सौदागर कांदे एक उपक्रमशील तसेच विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून तालुक्यात लोकप्रिय आहेत.जि.प.च्या आदर्श शिक्षक पुरस्कारानंतर महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र .राज्य यांच्या वतीने  दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय आदर्श पुरस्कारासाठी निवडचे पत्र नुकतेच यांना देऊन पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सौदागर कांदे यांचा सत्कार करतांना उद्योजक सुरेश नाना फड,बालासाहेब कराड, अंकुश फड  सर, पंचायत समितीचे कार्यालयीन अधिक्षक निळकंठ दराडे, महादेव फड सर, भास्कर आंधळे सर पत्रकार धनंजय आढाव, महादेव गीते व इतर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा