Subscribe Us

header ads

लोकप्रतिनिधी नसताना शासकीय विविध कामाचे उदघाटने करणे असंवैधानिक,

बीड स्पीड न्यूज 


लोकप्रतिनिधी नसताना शासकीय विविध कामाचे उदघाटने करणे असंवैधानिक,

लोकशाहीच्या विटंबनेचा प्रकार होय - पूर्व सैनिक प्रकाश वाघमारे

बीड ( प्रतिनिधी ) दि.20 बीड जिल्ह्यातील आमदार आणि खासदार यांनी त्यांच्या कालावधीत मतदार संघ क्षेत्र व जिल्ह्याचे विकसीत कामे करणे त्यांचे कर्तव्य असून संविधान विधी द्वारे घेतलेल्या शपथ पालन त्याने करावयास पाहिजे. परंतू बीड जिल्ह्यात मागील 72 वर्षात हे जे लोकप्रतिनिधी निवडून आले व काही कालावधी संपल्यानंतर पायउतार झाले. त्यांनी कोणी लोकहिताचे कामेही केली. मात्र बीड जिल्ह्याचे वास्तव्य विकसीत झालेच नाही. बीड जिल्हा निर्मितीच्या नंतर महाराष्ट्रात जे जिल्हे नवीन निर्माण झाले त्यांचा बीड जिल्ह्यापेक्षा अमुलाग्र बदल झाला या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारे काही राजकारणात सक्रीय राहिले तर काही परत प्रतिनिधीत्व करू शकले नाही. परंतू बीड जिल्ह्यात, तालुक्यात एक नाव राजकारणात व प्रतिनिधीत्व करण्यात सतत सक्रीय राहिले ते म्हणजे जयदत्त क्षीरसागर यांनी अनेक प्रकारच्या कुटील कारस्थानाने जनतेला झुलवत ठेवत बीड जिल्ह्यात स्वतःचे संस्थाने आदिलशाही निर्माण केली ते तीन चार वेळा मंत्री आमदार राहिले त्यांच्या मातोश्री खासदार राहीला या पदाच्या मोबदल्यात यांनी शासनाचे लाखो करोडो मानधन योजना मिळवल्या देशात विदेशात कोठे किती संपत्ती असेल याचा अंत लागणे कठीण आहे. गॅस एजेंसी, दुध प्रजोक्ट, शाळा विद्यालय, कारखाने, सुतगिरणी, खडी खदान, सैनिक स्कुल असे अनेक उपक्रम परत नवीन उद्योग उभारणी चालुच आहे. तीस-चाळीस वर्षे बंद असलेले उद्योग पुन्हा शासनाकडून मदत घेवून चालु करत आहेत, हे आमदार, मंत्री झाले की, शासनाचे प्रतिनिधीत्व करतात. आमदार, मंत्री नसले की तर उद्योजकाची भूमीका पार पडताना दिसतात. गजानन बँक नागरी सहकारी, आदर्श शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतपेढी, नवगण विनायक शिक्षक कर्मचारी सहकार पतसंस्था, गजानन सहकारी सुतगिरणी, बीड तालुका खरेदी विक्री संघ, गजानन साखर कारखाना यात गैरव्यवहार आहेत. याचे भांडण काका पुतण्यात प्रशासनात न्यायालयात मांडून गैरव्यवहार मुक्त करण्याचा तमाशा यांचा चालु आहे. खरे तर बीड जिल्ह्यातील ग्रॅजव्हेट सुशीक्षीत बेरोजगारांना हे उद्योग धंदे देणे गरजेचे असतानी यांनी स्वतः हाकडे हे उद्योग घेतले आहेत व त्यांना वापर करण्यात येणाऱ्या तरुणांना दारु दुकाने, मटका, आवमार्गाचे कामे दिली आहेत. बीडच्या जनतेला बीडला रेल्वे मागणी करण्याचे आंदोलने करावयास लावली. रेल्वे रुळाला खडी पुरवण्याचे प्लानींग ही यांनी अगोदरच केले. मोची पिंपळगांव येथील दगड खाणीची जमीन यांनी खरेदी करून सध्या बीड परळी रेल्वे रुळाला हे खड़ी पुरवत आहेत. या खदाणीतून खणीजाचा पैसा मिळावा म्हणून यांनी तेलगांव रोड, मोची पिंपळगांव फाटा ते बोरफडी ला जुळणारा रस्ताही अरूंद करून तो रोड बंद पाडून स्वतःहाचे हित साध्य कर आहेत. रेल्वे रुळ जमीन शासनाला हस्तांतरा करताना हिवरसिंगा ते मोची पिंपळगांव पर्यंत कुटूंबाच्या नावाने भूमापनात संपादन करून शासनाचा अफाट पैसा उचलला आहे. मोची पिंपळगांव खडी मिशीनची चौकशी करण्याचे आम्ही आंदोलन केले. परंतू त्याची चौकशी हे होवू देत नाहीत. ३० वर्षे बंद असणारी गजानन सुत गिरणी कोरोना काळात चालु केली. बिहारचे मजूर आणले माल चीन राष्ट्राला पाठवला. शॉट सर्कीटने गिरणी जाळली त्याची चौकशी करण्याचे आंदोलन केले त्याचीही चौकशी होऊ दिली नाही. कोरोनाच्या महामारीत जनतेला आर्थिक मदत करण्याऐवजी शासनाला आर्थिक मदत केली. बीडचे प्रशासन, न्यायालय यांनी मुठीत ठेवल्याने यांच्या गैर व्यवहारावर कारवाई होत नाही. कोरोना काळात यांनी त्यांच्या प्रायव्हेट सैनिक स्कुल मध्ये सैनिक भरती केली. हा गैरप्रकारच आहे. याची वाच्यता केली असता ते प्रकरण ही दडपण्यात आले. देवेंद्र फडणवीसांना नागपूर नगर पालिकेत यांच्या मंत्री काळात फंड वाढीव देऊन सहकार्य केल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या निरोपावरून बीडला येवून उद्घाटन करताना दिसतात व बीड जिल्हावासीयांना भुलथापाने झुलवत आहेत. अखिल भारतीय तेलीक शाहू महासंघाचे हे अध्यक्ष असल्याने राष्ट्रपती प्रधान मंत्री व भारतीय प्रशासन शासनात हे म्हणावे तसे कामे करून घेत आहेत. बांधकाम मंत्री असताना रोड पुल, टोलनाके, भ्रष्ट्राचारचे आरोप असतांना बीड जिल्ह्यातील, उडाण पुल रस्त्यांना यांनी यांच्या कुटूंबाचे नांवे देण्याचा कळस गाठला आहे. जसे की, या देशाचे हे राज्ये आहेत, येथे बीड जिल्ह्यात दुसरे कोणी क्रांतीकारी, देश भक्त त्यागी बलीदानी वीर समाज सेवकच नाहीत, काय दिनांक १७ ऑक्टोबर प्रा. सुरेश नवले यांनी प्रसिध्दीस केलेल्या वार्तालापाचे समर्थन करायला हवे बीड जिल्हा खाजगीकरणात आणून येथी सुशिक्षीत बेरोजगारांना शासकीय रोजगार मिळण्यापासून यांनी वंचीत ठेवले हे महापाप आहे. हे जनतेच्या लक्षात येणे गरजेचे आहे.आता हे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पिक पाहणी करू लागले. मंत्री असताना काही केले नाही. येथील लोक ही यांच्यामागे स्वार्थ साध्याकरिता फिरू लागले. जनतेने यांना नाकारले आहे. वर्तमान आमदार यावर आक्षेप का घेत नाहीत. सेवा सोसायटीचे पॅनल निवडून आणले म्हणून गुलाल बुके उधळू लागले. प्रशासन शासनात हस्तक्षेप होताना ही यंत्रणा गप्प कशी हे कोणत्या पक्षाचे आहेत हे जनतेला कळू देत नाहीत आणि नगर पालिका निवडणूक जवळ आली की, कोटी कोटी उद्घाटन करण्याचा फंडा घालू लागले. बीडच्या जनतेने सावध राहून पुढील भावी नेता निवडावा, ही अपेक्षा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा