Subscribe Us

header ads

राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेसाठी बीड जिल्हा संघ जाहिर

बीड स्पीड न्यूज 


राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेसाठी बीड जिल्हा संघ जाहिर

बीड | प्रतिनिधी -: महाराष्ट्र राज्य बेंच प्रेस अजिंक्य पद स्पर्धेचे आयोजन इंदापूर पुणे येथे महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशन यांचे मान्यतेने पुणे जिल्हा पॉवर लिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य ( पुरुष आणि महिला ) सबज्युनिअर , ज्युनिअर , सिनियर व मास्टरर्स बेंच प्रसे अजिंक्य पद स्पर्धा सन 2022 दिनांक 22 व 23 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात येणार असून या स्पर्धेसाठी बीड येथील लाईफ हेल्थ क्लब , लाईफ स्टाईल जिम , महात्मा फुळे शॉपींग सेंटर , नवी भाजी मंडई , बीड येथे जिल्हास्तरीय बेंच प्रेस स्पर्धाचे आयोजन करण्यात आले . या स्पर्धेत पुरुष गटात सय्यद अल्तमश , पंकज परशुराम तावरे, शेख साहिल राज, गायकवाड अदितीया जग्पती, अमोलसिंह गायकवाड, पंकज तावरे, महिला गटात ; प्रिया मंगेश मुंडे, शेन्द्रे कोमल नामदेव यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली तर संघ प्रशिक्षक म्हणून बीड जिल्हा पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे सचिव सय्यद अमानउल्लाह अरशियानउल्लाह तर सदरील निवड स्पर्धा , मराठवाडा पत्रकार संघ अध्यक्ष वैभव स्वामी , संतोष जाधव शेख शकील मोहम्मद यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली . यावेळी राष्ट्रीय प्रशिक्षक पंच सय्यद अरशियानउल्लाह मिसबाहउल्लाह यांचे मार्गदर्शन लाभले . या स्पर्धे वेळी शेख नसिर  ,जग्पती गायकवाड , महादेव वाघमारे, जिल्ह्यातील खेळाडू , व्यायामशाळा, हेल्थ क्लब , जीम चालक मालक मंडळी इ. उपस्थित होते .खेळाडूंना स्पर्धेच्या यशासाठी मा .जिल्हा परिषद अध्यक्ष मा .श्री .विजयसिंह पंडित , जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख मॅडम ,डॉ .सय्यद मसिह यांनी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा